परभणी येथे संचारबंदीत किरकोळ वाहतूक चालू, तर व्यापार्‍यांचा कडकडीत बंद !

विवाह कार्य, मोर्चे, निदर्शने आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांवरही ३१ मार्चपर्यंत बंदी

आनेवाडी (जिल्हा सातारा) येथील पथकर नाक्यावरील कर्मचार्‍यास मारहाण

वादग्रस्त पथकर नाका म्हणून ओळख असणार्‍या आनेवाडी (जिल्हा सातारा) येथील पथकर नाक्यावरील कर्मचार्‍यास अज्ञात टोळक्याने मारहाण केली आहे. या मारहाणीचे ध्वनिचित्रीकरण सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रसारित झाले आहे.

नीतेश राणे यांच्या आरोपात तथ्य नाही, कायदेशीर नोटीस देणार ! – वरुण सरदेसाई, शिवसेना

‘आय्.पी.एल्.’ स्पर्धेत बेटिंगवाल्यांकडून हप्त्याचा वाटा मिळावा, यासाठी वरूण सरदेसाई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या संपर्कात होते, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केला होता. यावर वरुण सरदेसाई यांनी उत्तर दिले.

अंबानी यांच्या कुटुंबासाठी भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेचा दुरुपयोग केला ! – नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

महाराष्ट्र सरकारची अपकीर्ती करण्यासाठी सचिन वाझे यांना खलनायक ठरवण्याचे काम भाजपकडून करण्यात आले आहे.

क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्याविषयी अवमानकारक पोस्ट टाकल्याने तक्रार नोंद !

पोलिसांनी तत्परतेने अशा समाजकंटकावर कारवाई केली पाहिजे.

केरळमध्ये ‘नमः शिवाय’ ऑनलाईन सामूहिक नामजप पार पडला भावपूर्ण वातावरणात !

महाशिवरात्रीच्या पावन दिवशी, म्हणजेच ११ मार्च या दिवशी ‘नमः शिवाय’ हा सामूहिक नामजप हिंदी आणि मल्याळम् भाषेत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. या दोन्ही भाषांतील कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सातारा नगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे भ्रमणभाष देयक न भरल्यामुळे बंद !

सरकारी पदाचा गैरवापर करणारे आणि आपल्यामुळे सर्वांची हानी करणारे असे अधिकारी नकोच !

बेळगावमधील मराठी भाषिकांवरील अन्यायाच्या विरोधात सावंतवाडीत उद्या धरणे आंदोलन

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्‍न न्यायालयात प्रलंबित असतांना कन्नड भाषिकांनी चालवलेली मनमानी आणि अरेरावी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ ते १९ मार्चपर्यंत मनाई आदेश लागू

जिल्ह्यामध्ये ५ किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे, सभा घेणे यांस मनाई आहे.

मालवण येथे अवैध मासेमारीच्या विरोधात पारंपरिक मासेमारांचे बेमुदत साखळी उपोषण चालू

३५ हायस्पीड ट्रॉलर्स अवैधपणे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मासेमारी करत होते