१०० दिवसांत ३ सहस्र ५०० किलोमीटर पायी प्रवास करत मधुकर कुलथे यांनी पूर्ण केली नर्मदा परिक्रमा !

भाटवडगाव येथील मधुकर कुलथे यांनी सलग दुसर्‍या वर्षी ३ सहस्र ५०० किलोमीटर पायी चालत नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे. कोरोनाच्या वैश्‍विक महामारीतून भारत देशासह जगाने लवकर बाहेर पडावे, तसेच अवघ्या विश्‍वाचे कल्याण व्हावे, या उद्देशाने ५ राज्यांतून ही परिक्रमा कुलथे यांनी केली आहे.

फलटण (सातारा) येथे गोवंशियांची अनधिकृतपणे वाहतूक करणार्‍या २ वाहनांवर कारवाई

फलटण (जिल्हा सातारा) शहरातील कुरेशीनगर भागात वधासाठी गोवंशियांना आणले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने कुरेशीनगर भागात जाऊन वाहने आणि गोवंशीय यांना कह्यात घेतले.

आरोग्य व्यवस्था सुधारणे आणि लसीकरण वाढवणे यांवर भर देण्यात येणार ! – विभागीय आयुक्त सौरभ राव

कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक वेगाने वाढत असल्याने लसीकरणात पुण्याला प्राधान्य मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली.

इंधन दरवाढ अल्प करा; अन्यथा देशभर आंदोलन करू ! – ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस

वाहतूकदारांनी खर्चावर आधारीत भाडे निश्‍चित करण्याविषयी मोटार वाहन कायद्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. इंधन (डिझेल) दरवाढ अल्प करणे आणि व्यवसायवृद्धीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याविषयी सरकारला १४ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

अत्याचार प्रकरणातील आरोपीसमवेत मद्यप्राशन आणि मेजवानी करणार्‍या २ पोलिसांचे निलंबन

एका मुकबधीर मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी तुकाराम कुडूक या नराधमाला न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या आरोपीचा शिक्षेचा निर्णय झाला, त्याच दिवशी २ पोलिसांनी उपाहारगृहामध्ये आरोपीसमवेत मद्यप्राशन करत मेजवानी केल्याचे समोर आले आहे.

कोरेगाव पार्क येथे ‘स्पा सेंटर’च्या नावाखाली चालू होता वेश्याव्यवसाय !

समाजाची नैतिकता ढासळत चालल्याने आणि धर्मशिक्षण नसल्यामुळेच अशा प्रकारच्या गोष्टी सर्रास होत आहेत. संबंधितांवर तात्काळ आणि कठोर कारवाई व्हायला हवी तरच असे प्रकार थांबतील.

…तर राज्यातील सरकार कोसळेल ! – अभिनेत्री कंगना राणावत 

येथील पोलीस दलातील साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एन्.आय.ए.ने अटक केली. या अटकेनंतर राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणावरून अभिनेत्री कंगना राणावत हिने महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्रात सध्या जे घडते आहे, ते राज्याच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही ! – संजय राऊत

सुधीर मुनगंटीवर यांनी विधीमंडळात ‘पुढच्या ३ मासांत आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ’, असे वक्तव्य केले. हा फाजील आत्मविश्‍वास सरळ स्वप्नरंजन आहे. पुन्हा सत्तेवर येण्यासाठी नवा घोडेबाजार होणार असेल, तर भाजप स्वत:ची उरलीसुरली प्रतिष्ठाही गमावून बसेल.

नाथ संप्रदायाचे गाढे अभ्यासक आणि सनातन संस्थेच्या कार्याप्रती आत्मीयता असणारे नगर येथील पू. (प्रा.) अशोक नेवासकर यांचा देहत्याग

पू. (प्रा.) अशोक नेवासकर (वय ७९ वर्षे) यांनी १२ मार्च २०२१ या दिवशी सायंकाळी देहत्याग केला. देहत्यागापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार नेवासकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.