हिंदु राष्ट्र संकल्पना असंविधानिक ठरवू पहाणार्‍यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंवरील वाढत्या आघातांच्या घटना पहाता हिंदु राष्ट्र संकल्पना असंविधानिक ठरवू पहाणार्‍यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रांतीय हिंदु अधिवेशनाच्या माध्यमातून प्रयत्न करूया. यापुढे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येक पाऊल टाकणे आवश्यक आहे.

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी, पोलिसांचा सौम्य लाठीमार !

येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाच्या वेळी प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. येथील ‘अर्धनारी नटेश्वर यात्रा समिती’च्या वतीने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

पश्चिम महाराष्ट्रात गदापूजन करून हनुमंताला हिंदु राष्ट्रासाठी साकडे !

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे २७० हून अधिक ठिकाणी गदापूजन, सोलापूर, लातूर, बीड येथे ९० हून अधिक ठिकाणी गदापूजन.

सोलापूर येथे समाजकंटकांकडून गोरक्षकाच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न !

जे काम पोलिसांचे आहे ते काम गोरक्षकांना जीव धोक्यात घालून करावे लागत आहे. प्रतिदिन गायींची पशूवधगृहाकडे होणारी वाहतूक ही गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्याचेच दर्शवते !

सोलापूर शहरातील पाणीपुरवठा किमान ३ दिवसाआड करण्याचा प्रयत्न ! – संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त

सध्या शहरात ४ ते ५ दिवसआड पाणीपुरवठा केला जात आहे. पुढील काही मासांमध्ये शहरात किमान ३ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न असेल. शहराची लोकसंख्या वाढली असल्याने २६ नवीन पाण्याच्या टाक्या बसवण्याचे नियोजन आहे.

मागील १५ मासांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील १ सहस्र ८४४ महिला-मुली बेपत्ता !

मुली आणि महिला यांनी बेपत्ता होणे, हे गंभीर अन् चिंताजनक आहे. प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मुलींवर लहानपणापासूनच संस्कार करणे आवश्यक आहे !

सोलापूर येथे अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून अत्याचार करणार्‍या धर्मांधावर गुन्हा नोंद

नेहमीच महिलांवर अत्याचार करणार्‍यांमध्ये धर्मांध पुढे असतात, यातून त्यांची वासनांध मानसिकता लक्षात येते ! !

हानीभरपाई देण्‍यासाठी ७ सहस्र रुपयांची लाच स्‍वीकारून तलाठी पसार !

प्रशासकीय विभागातील लाचखोरांना कठोर शिक्षा केल्‍याविना लाच घेण्‍याचे प्रकार थांबणार नाहीत !

‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज श्रीशंभू सेवा’ पुरस्काराने सोलापूर येथील श्री. संजय साळुंखे सन्मानित !

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने श्री क्षेत्र वढू येथे उल्लेखनीय धर्मकार्य केल्याविषयी राज्यातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ‘श्री शंभू सेवा’ पुरस्कार हा सोलापूर येथील ‘हिंदु धर्मरक्षक’ अशी ओळख असलेले श्री. संजय साळुंखे यांना देण्यात आला.

पंढरपूर तहसीलमधील अनेक वर्षे कार्यरत कर्मचार्‍यांचे त्‍वरित स्‍थानांतर करा !

पंढरपूर तालुक्‍यात महसूल विभागाशी संबंधित अनेक शासकीय कार्यालयांत तलाठी, तहसीलदार, अव्‍वल कारकून या पदांवर कार्यरत असलेली मंडळी वर्षानुवर्षे एकाच जागी सेवेत आहे.