सोलापूर, ५ एप्रिल (वार्ता.) – देशी गायींना पशूवधगृहाकडे नेणार्या चारचाकी वाहनास अडवण्यासाठी गेलेले गोरक्षक श्री. प्रवीण यंगल यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ५ एप्रिलच्या पहाटे बेळे ब्रीज या ठिकाणी ही घटना घडली.
चारचाकी वाहन ते मुजफ्फर कुरेशी यांच्या मालकीचे असल्याचे समजते. फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे वाहन चालकावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती. पोलिसांनी वाहन कह्यात घेतले असून पुढील अन्वेषण ते करत आहेत. या आक्रमणात श्री. प्रवीण यंगल हे गंभीर घायाळ असून त्यांच्या पायालाचा अस्थिभंग झाला आहे. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत.
संपादकीय भूमिकाजे काम पोलिसांचे आहे ते काम गोरक्षकांना जीव धोक्यात घालून करावे लागत आहे. प्रतिदिन गायींची पशूवधगृहाकडे होणारी वाहतूक ही गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्याचेच दर्शवते ! |