‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज श्रीशंभू सेवा’ पुरस्काराने सोलापूर येथील श्री. संजय साळुंखे सन्मानित !

श्री. संजय साळुंखे

सोलापूर, २४ मार्च (वार्ता.) – छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानदिनाच्या निमित्ताने श्री क्षेत्र वढू येथे उल्लेखनीय धर्मकार्य केल्याविषयी राज्यातील हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ‘श्री शंभू सेवा’ पुरस्कार हा सोलापूर येथील ‘हिंदु धर्मरक्षक’ अशी ओळख असलेले श्री. संजय साळुंखे यांना देण्यात आला. हा सन्मान सोलापूरवासियांसाठी अभिमानास्पद आहे. या वेळी शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि ११ सहस्र रुपये देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘सुदर्शन’ वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके, अखिल भारतीय दहशतवाद विरोधी संघटनेचे मनिंदर सिंग बिट्टा, समस्त हिंदु आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, वढू गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(डावीकडे) सत्कार स्वीकारतांना श्री. संजय साळुंखे आणि उपस्थित अन्य मान्यवर

श्री. संजय साळुंखे यांनी लव्ह जिहादला बळी पडलेल्या किंवा त्या मार्गावर असलेल्या शेकडो हिंदू मुलींना सुरक्षित जीवन देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे हे कार्य संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणादायी असल्याचे मनोगत या वेळी प्रमुख मान्यवरांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला सोलापूर येथून सर्वश्री दादासाहेब सरवदे, सुधीर बहिरवाडे, अक्षय अंजिखाने, यतीराज होनमाने, संदीप महाले, प्रसाद झेंडगे, लक्ष्मण साळुंखे, नागेश मंजेली, नंदकुमार विटकर, अनिल कुंचपोर, हिरालाल पवार, अमर पवार आदी उपस्थित होते.