पंढरपूर तहसीलमधील अनेक वर्षे कार्यरत कर्मचार्‍यांचे त्‍वरित स्‍थानांतर करा !

भाजपच्‍या किसान आघाडीची मागणी

सोलापूर, २२ मार्च (वार्ता.) – पंढरपूर तालुक्‍यात महसूल विभागाशी संबंधित अनेक शासकीय कार्यालयांत तलाठी, तहसीलदार, अव्‍वल कारकून या पदांवर कार्यरत असलेली मंडळी वर्षानुवर्षे एकाच जागी सेवेत आहे. त्‍यांचे अन्‍यत्र स्‍थानांतर करावे, अशी मागणी भाजपचे किसान आघाडीचे जिल्‍हा सरचिटणीस महादेव खिलारे यांनी पत्रकार परिषदेत केली.