अक्‍कलकोट देवस्‍थानच्‍या नावे भामट्यांकडून भाविकांची लूट !

देवस्‍थानांच्‍या नावे लूट केल्‍याने अनेक पटींनी पाप लागते, हे समजण्‍यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्‍यक !

पाकिस्‍तानातील हिंदूंवर होत असलेले अत्‍याचार रोखण्‍यासाठी सोलापूर येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलन’ !

श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या वेळी दंगली करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

(म्‍हणे) ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या ‘सहा सोनेरी पाने’ पुस्‍तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान !’ – प्रणिती शिंदे, आमदार, काँग्रेस

‘सहा सोनेरी पाने’ या पुस्‍तकात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महिला यांचा अवमान करण्‍यात आला आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्‍या आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

गोतस्करीत जप्त केलेली वाहने न्यायालयाच्या आदेशाविना सोडून देऊ नये !

पोलीस उपायुक्त कबाडे यांनी गुन्ह्यांमध्ये जप्त असलेली वाहने न्यायालयाच्या अनुमतीविना सोडली जाणार नाहीत याची दक्षता घेण्याचे, तसेच एकच वाहन २ किंवा त्याहून अधिक गुन्ह्यांमध्ये वापरल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित वाहनाची अनुमती रहित होण्याविषयी उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आदेश काढले आहेत.

सोलापूर बसस्‍थानकातील अस्‍वच्‍छता दूर करून नागरिकांना आवश्‍यक सुविधा त्‍वरित पुरवाव्‍यात !

येथील बसस्‍थानकाच्‍या प्रवेशद्वाराजवळच घाणीचे साम्राज्‍य पसरले आहे. प्‍लास्‍टिकच्‍या बाटल्‍या, पिशव्‍या, चिखल आणि बसस्‍थानकावर उघड्यावर करण्‍यात येत असलेले मूत्रविसर्जन यांमुळे बसस्‍थानकावर अत्‍यंत अस्‍वच्‍छता असून दुर्गंधी पसरली आहे.

कासेगाव (जिल्हा सोलापूर) येथे शंभु महादेव कावड यात्रा उत्साहात पार पडली !

शिखर शिंगणापूर येथे शंभु महादेवाचे मंदिर बांधणार्‍या राजा सिंघणदेव यांच्या कार्यकाळात त्यांचे प्रधान हेमाद्रीपंत यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव (तालुका दक्षिण सोलापूर) येथे शिंगणापूरसारखीच रचना असणारे मंदिर बांधण्यात आले.

सोलापूर येथे माहेश्वरी समाजाचा ‘प्रीवेडिंग शुटींग’वर बहिष्कार घालण्याचा निर्णय !

माहेश्वरी समाजाने घेतलेल्या निर्णयाचा आदर्श प्रत्येक समाज घेईल तो सुदिन  !

स्वयंपाकासाठी वापरण्यात येणार्‍या गॅसचा वापर रिक्शा चालवण्यासाठी होत असल्याचे उघड !

स्वयंपाकगृहामध्ये वापरण्यात येणार्‍या गॅसच्या टाकीमधील गॅस अवैधपणे रिक्शामध्ये भरतांना पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी नितीन यादगिरी, जाफर ईस्माईल कारगिर, आदिल रफिक शेख आणि विजय गणपा या चौघांच्या विरोधात वळसंग पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सोलापूर येथे लव्ह जिहादच्या उद्देशाने महिलेचा विनयभंग करणार्‍या धर्मांधावर गुन्हा नोंद !

अशा प्रकारांना आळा बसण्यासाठीच राज्यात लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा अस्तित्वात यावा, असे हिंदूंना वाटते !

सोलापूरला दैनंदिन पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने कार्यवाही करावी ! – राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री

या वेळी आमदार समाधान अवताडे यांनी मंगळवेढा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालू करण्याविषयी आवाहन केले. भोसे आणि अन्य ३९ गावे या ठिकाणी ‘प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, मंगळवेढा’ ही योजना फेब्रुवारी २०२० अखेर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होती.