सोलापूर – ‘श्रीराम सेवा समिती’च्या वतीने श्रीराम भक्तांसाठी श्रीरामनवमी ते हनुमान जयंती अखंड ‘श्रीराम जय राम जय जय राम’, असा नामजप २४ घंटे करण्याचे ‘संकल्प अभियान’ आयोजित केले आहे. या संकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी श्रीराम भक्तांना त्यांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात श्रीरामाचा नामजप करायचा आहे. श्रीरामाचा अखंड नामजप करण्याच्या सेवेत सहभागी होण्यासाठी इच्छुक भक्तांनी श्री. गोपाल सोमानी ९४२२० ६४७६४, गोपाल सारडा ९४२२० ६७११० यांना संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.