राज्य परिवहन महामंडळातील ३ सहस्र ८०० बसगाड्यांमधील गतीदर्शक यंत्र बंद !
महाराष्ट्रात विविध गावांमधून धावणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या ३ सहस्र ८०० बसगाड्यांमधील ‘स्पीडोमीटर’ (गतीदर्शक यंत्र) बंद आहे. त्यामुळे चालकांना गाड्यांची गती समजत नाही.
महाराष्ट्रात विविध गावांमधून धावणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या ३ सहस्र ८०० बसगाड्यांमधील ‘स्पीडोमीटर’ (गतीदर्शक यंत्र) बंद आहे. त्यामुळे चालकांना गाड्यांची गती समजत नाही.
नागरिकांवर अशी मागणी करण्याची वेळ येणे दुर्दैवी ! सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतःहून पुलाची दुरुस्ती का करत नाही ?
अयोध्येत २२ जानेवारी २०२४ या दिवशी प्रभु श्रीरामचद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. हा समस्त हिंदू समाजासाठी ऐतिहासिक क्षण होता. या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने सकल हिंदू समाजाद्वारे भव्य अशा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
अमेरिकेतील इंडियाना राज्यात नील आचार्य या भारतीय विद्यार्थ्याचा २८ जानेवारी या दिवशी मृत्यू झाला. नील हा उच्चशिक्षणासाठी येथील पर्ड्यू विद्यापिठात शिकत होता. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कर्नाटकातील चिक्कबल्लापूर येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेतील २ विद्यार्थीनी शौचालयांची स्वच्छता करत असतांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. यावरून टीका होऊ लागल्याने शिक्षण विभागाने शाळेच्या मुख्याध्यापकांना निलंबित केले.
हबीब नजर नावाच्या १०३ वर्षे वयाच्या स्वातंत्र्यसैनिकाने फिरोज नावाच्या एका ४९ वर्षीय महिलेशी विवाह केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भातील त्यांचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमातूंन मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.
राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती गेल्या २१ वर्षांपासून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ या चळवळीद्वारे प्रबोधन करत आहे. या चळवळीच्या अंतर्गत पुणे, पिंपरी, चिंचवड ,नाशिक रोड,जुन्नर, तळेगाव,सासवड येथील ५५ हुन अधिक शाळांमध्ये निवेदन दिले.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारीनिमित्त ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध शहरांत, तालुक्यांत, गावांत प्रशासन, पोलीस, तसेच शाळा आणि महाविद्यालयात निवेदन देण्यात आले.
अनुदान घोषित करतांना अभ्यास केला जात नाही का ? रिक्शाचालकांना पुरेशाप्रमाणात रक्कम न देता अनुदान घोषित करून काय उपयोग ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला, अनेक तालीम बांधल्या. यातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडले आहेत. हीच परंपरा कायम रहाण्यासाठी तालमींमध्ये वस्ताद आणि मल्ल यांना सर्व सुविधा असणार्या तालीम बनवणे आवश्यक आहे.