केरळचा उदो उदो करण्याच्या नादात काँग्रेसचे नेते शशी थरूर यांचा खोटारडेपणा उघड !

शशी थरूर पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहेत. वास्तविक महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे ६ वर्षांपूर्वीच ‘भिलार’ हे गाव ‘पुस्तकांचे पहिले गाव’ म्हणून उभारण्यात आले आहे.

प्रयागराज, वाराणसी आणि अयोध्या येथे एकूण १ कोटी लोकांची भेट !

९ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या मौनी अमावास्येला प्रयागराज, वाराणसी आणि अयोध्या येथे एकूण १ कोटीहून अधिक भाविक एकत्र आले. प्रयागराजमध्ये चालू असलेल्या माघ मेळ्यात भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले.

‘दुसर्‍याला आनंद देण्यात जगणे, म्हणजे खरे जीवन’, या विचारांच्या आदर्शांचा तरुणांसमोर अभाव !

कुठलीही सुट्टी लागली की, लोक घरातून अक्षरशः बाहेर सुखाच्या शोधात धावत असतात. सुखाचा शोध बाहेर चालू आहे. याला ‘व्हाईट मॅन्स बर्डन’ असे म्हणतात. गोर्‍या कातडीचे आणि पाश्चात्त्य विचारांचे गारुड आपल्या तरुणांवर आजतागायत तसेच आहे !

Gyanvapi Verdict : ज्ञानवापी खटल्यात न्यायाचे उद्दिष्ट पूर्ण करूनच निर्णय दिला ! – निवृत्त न्यायाधीश अजय कृष्ण विश्‍वेश

जोपर्यंत मी न्यायालयीन सेवेत राहिलो, तोपर्यंत मी माझे काम पूर्ण निष्ठेने आणि कष्टाने केले. ज्ञानवापी संकुलात असलेल्या व्यासजींच्या तळघरात पूजेला अनुमती देण्याविषयी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेऊन हा आदेश काढण्यात आला.  

संपादकीय : प्रशासकीय हलगर्जीपणा !

फटाक्यांच्या कारखान्यांमधील मृत्यूप्रकरणी उत्तरदायी दोषी अधिकार्‍यांवरही कठोर कारवाई होणे अपेक्षित !

आजच्या तरुणांसमोर मोठे ध्येय आणि आदर्श नसणे !

आजच्या तरुणांकडे पहातांना असे लक्षात येते की, त्यांना सर्व गोष्टींची घाई झालेली आहे. त्यांना सर्व गोष्टी लवकरात लवकर मिळवायच्या आहेत. जगातील महागातील महाग गोष्टी त्यांच्याकडे असल्या पाहिजेत आणि त्याचे सामाजिक माध्यमांवर प्रदर्शन केले की, त्यांना सुखी असल्यासारखे वाटते.

अयोध्येमध्ये राहिलेले काम पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्री गणेशाकडे प्रार्थना करायची आहे ! – श्री श्री श्री जगद्गुरु कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी

भारतामध्ये धर्मासाठी मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे. अयोध्येमध्येही चांगले काम झाले आहे आणि अजून होणे बाकी आहे. आणखी जे राहिलेले काम आहे, ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्री गणेशाकडे प्रार्थना करायची आहे, असे श्री श्री श्री जगद्गुरु कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांनी सांगितले.

चिलीमध्ये लागलेल्या भीषण आगीत ११२ जणांचा मृत्यू !

दक्षिण अमेरिकी देश चिलीच्या जंगलात आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग रहिवासी भागात पसरल्याने आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. आग सर्वप्रथम विना डेल मार आणि वालपरिसो शहरांच्या जंगलात लागली.

चित्रपटात महिलांना ‘आयटम’ (वस्तू) म्हणून दाखवले जाते, याची मला लाज वाटते ! – अभिनेते आमीर खान

हिंदी चित्रपटांतून महिलांना उपभोगाची वस्तू म्हणून दाखवले जाते, हे एकाने तरी मान्य केले आणि त्यांना त्याची लाज वाटते, हेही नसे थोडके !  हे रोखण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे अपेक्षित !

मुंबईत शिक्षिकेची अपकीर्ती करणार्‍याच्या विरोधात गुन्हा नोंद !

अशांचा तातडीने शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करायला हवी !