नेपाळमध्ये मुसलमानांनी न्यायमूर्तींच्या विरोधात काढलेल्या मोर्चात ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !

न्यायमूर्तींनी कथित इस्लामविरोधी ‘पोस्ट’ प्रसारित केल्याचा फुकाचा दावा

(सर तन से जुदा म्हणजे शिर धडापासून वेगळे करणे)

काठमांडू – नेपाळमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमलनारायण दास यांच्या नावाची एक ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली आहे. या पोस्टमध्ये प्रेषित महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याचा आरोप करत मुसलमानांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या जमावाने ‘अल्लाह-हु-अकबर’ (अल्ला महान आहे), ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देत अनेक ठिकाणी रस्त्यांवरील वाहतूक अडवली. नेपाळच्या ‘मुस्लिम आयोगा’ने या प्रकरणी सरकारला लिहिलेल्या पत्रात न्यायमूर्ती कमलनारायण दास यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. नेपाळी पोलीस किंवा कोणतीही अन्वेषण यंत्रणा अधिकृतपणे ही पोस्ट कुणाकडून लिहिण्यात आली आहे, हे सांगू शकलेली नाही. असे असतांनाही नेपाळमधील मुसलमान समुदाय रस्त्यावर उतरून न्यायमूर्ती दास यांच्या अटकेची मागणी करत आहे.

मुस्लिम आयोगाचा थयथयाट

या पोस्टमध्ये रमझाननिमित्त पाळलेल्या उपवासावर टिप्पणी केल्याचा आरोप मुस्लिम आयोगानेे केला आहे. रमझानच्या काळात ही पोस्ट प्रसारित करणे म्हणजे नेपाळमधील बंधुत्व नष्ट करण्याचा कट आहे.  या प्रकरणी अभिव्यक्तीस्वातंत्र्यासारखे युक्तीवाद चुकीचे ठरवत हे आपल्या संस्कृतीवर आक्रमण आहे, असे मुस्लिम आयोगाने म्हटले आहे.

संपादकीय भूमिका 

  • पाकिस्तानमध्ये हिंदूंनी इस्लामचा अवमान केल्याची अफवा पसरवून त्यांना ठार मारल्याची किंवा शिक्षा सुनावल्याची अनेक उदाहरणे आहेत. नेपाळमधील मुसलमानही तोच कित्ता गिरवत आहेत, असे वाटल्यास चूक ते काय ?
  • जगाच्या पाठीवर कुठेही असो, धर्मावर कथित आघात झाल्याचा दावा करत मुसलमान कायदा हातात घेतात, याचे हे आणखी एक उदाहरण !