दोडामार्ग (सिंधुदुर्ग) तालुक्यात हत्तीमुळे लाखो रुपयांची हानी : ५ हत्तींचा कळपही पडला दृष्टीस !

अन्नाच्या शोधात हत्ती शेती आणि बागायती यांची हानी करत असून आता ते थेट लोकवस्तीत येऊ लागल्याने शेतकरी अन् ग्रामस्थ यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षे हत्तींची समस्या न सुटणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

सिंधुदुर्ग : मनसेच्या शिष्टमंडळाची बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी

मालवण येथे नौदलदिनाच्या निमित्ताने केलेल्या कामांची सविस्तर माहिती द्या ! यासाठी केलेली काही कामे निविदा काढण्यापूर्वी करण्यात आल्याची चर्चा येथे चालू आहे. त्यानंतर घाईगडबडीत निविदांचे विज्ञापन देऊन निविदा काढण्यात आल्या.

सिंधुदुर्ग : ८४ लाख रुपयांहून अधिक किमतीच्या मद्याची अवैध वाहतूक करणार्‍याला अटक !

बांदा शहरातील श्री पिंपळेश्‍वर मंदिर चौकात करण्यात आलेल्या कारवाईत १ लाख ७२ सहस्र ८०० रुपयांचे मद्य, वाहतुकीसाठी वापरलेले वाहन आणि अन्य साहित्य मिळून एकूण ६ लाख ७२ सहस्र ८०० रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला.

देवगड (सिंधुदुर्ग) समुद्रात बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला

संकल्प सैनिक अकादमी, पुणे या संस्थेच्या येथे पर्यटनासाठी आलेल्या मुलांपैकी ६ मुले येथील पवनचक्की परिसरातील समुद्रात ९ डिसेंबर या दिवशी बुडाली होती. या घटनेतील मृतांची संख्या ५ झाली आहे.

World Soil Day : मातीतील जैवविविधता नष्ट झाली, तर संपूर्ण सृष्टीचक्र बिघडून जाईल ! – विकास धामापूरकर, शास्त्रज्ञ

असंतुलित रासायनिक खतांमुळे भूमीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे उत्पादित होणारे अन्न विषारी उत्पादित होते. जर प्रत्येक नागरिकाला विषमुक्त अन्न हवे असेल, तर . . .

Indian Navy Day 2023 : नौदलाकडून स्थानिक प्रशासकीय अधिकार्‍यांचा सन्मान !

विविध खात्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे उत्कृष्ठ सहकार्याबद्दल नौदलाच्या वतीने ‘चिफ ऑफ द नेव्हल स्टाफ’ हे पदक आणि प्रशस्तीपत्रक देऊन ५ डिसेंबर या दिवशी सत्कार करण्यात आला.

संपादकीय : नौदलदिनाचा अन्वयार्थ !

भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करून एक संदेश जगताला दिला आहे. तो केवळ चीनच नव्हे, तर भारतावर डोळे वटारून पहाणार्‍या प्रत्येक देशाने लक्षात ठेवणे त्याच्या हिताचे असणार आहे !

Navy Day : नौदलातील पदांची नावे भारतीय परंपरांनुसार करणार ! – पंतप्रधान मोदी यांची घोषणा

आता यावरून कथित धर्मनिरपेक्षतावादी राजकीय पक्ष, साम्यवादी आणि  पुरो(अधो)गामी कंपूने भारतीय नौदलाचे भगवेकरण होत असल्याची आवई उठवण्यास आरंभ केला, तर आश्‍चर्य वाटू नये !

Indian Navy Day 2023 : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्णक्षण !

भारतीय नौदलाच्या इतिहासात प्रथमच नौदलदिन सोहळा नौदलाच्या तळापासून अन्य ठिकाणी साजरा होत आहे. याचा बहुमान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला असून जिल्ह्यासाठी हा सोहळा सुवर्णक्षण ठरणार आहे !

Indian Navy Day 2023 : नौसेना दिनानिमित्त वाहतुक व्यवस्थेत बदल

जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्यावर ४ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण व तारकर्ली येथे भारतीय नौसेनेचा नौदल दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्त वाहतूक व्यवस्थेतील झालेले पालट देत आहोत.