भगवान श्रीराम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी : विनोदी कलाकार यश राठी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

अशांच्या कार्यक्रमांवर सरकारने सर्वत्र बंदी घालून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे, तरच ते वठणीवर येतील !

राजकीय दुकान बंद होण्याच्या भीतीने काहींचा हिंदुत्वाला विरोध ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आमच्या अयोध्या दौर्‍याचा काहींना त्रास झाला; कारण त्यांना हिंदुत्वाची ‘अ‍ॅलर्जी’ आहे. हे लोक हिंदु धर्माविषयी चुकीचा प्रचार करत होते. त्यांना वाटते की, हिंदुत्व सर्वांच्या घरात आणि मनात पोचले, तर त्यांची राजकीय दुकाने बंद होतील.

श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने पलूस येथे शोभायात्रा !

श्रीरामनवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने श्री धोंडिराज मंदिर येथे ३० मार्चला श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला, तसेच शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

प.प. श्रीधरस्वामी यांच्याकडून ‘गीतरामायणा’विषयी घडलेला दैवी साक्षात्कार !

आज ८ एप्रिल २०२३ या दिवशी प.प. (परमहंस परिव्राजकाचार्य) श्रीधरस्वामी यांची पुण्यतिथी !

१५५ देशांतील नद्यांच्या पाण्याद्वारे होणार अयोध्येतील श्रीराममंदिरात जलाभिषेक !

श्रीरामजन्मभूमीवर बांधले जात असलेले भव्य श्रीरामंदिर पूर्ण झाल्यानंतर होणार्‍या मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी जगभरातील १५५ नद्यांच्या पाण्याद्वारे महाजलाभिषेक करण्यात येणार आहे.

‘आदिपुरुष’ या आगामी चित्रपटाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट !

चित्रपटाच्या भित्तीपत्रकात प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांना जानव्याअभावी, तर सीतामातेला तिच्या भांगामध्ये कुंकवाअभावी दाखवण्यात आले आहे. त्यामुळे साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

भक्तशिरोमणी महाबली हनुमान !

श्रीरामाचे स्मरण होताच रामभक्त हनुमानाचीही आठवण येते आणि हनुमानाचे स्मरण होताच डोळ्यांपुढे प्रभु श्रीरामांचे मुखमंडल येते. प्रभु श्रीराम आणि हनुमान हे भक्त अन् भगवंत यांच्या पवित्र नात्याचे सर्वाेत्कृष्ट उदाहरण आहेत.

श्रीरामभक्तीमय झालेल्या हनुमंताप्रमाणे ‘गुरुभक्ती’ आणि ‘गुरुसेवा’ हाच साधकांसाठी ध्यास अन् श्वास बनावा !

या कलियुगात अवतरलेल्या श्रीरामस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) अवतारत्वाची अनुभूती घेत रहाणे’, हीच ‘गुरुभक्ती’ आहे, तर त्यांच्या अवतारी चरित्राचे कीर्तन करणे, म्हणजेच ‘गुरुसेवा’ आहे.

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपासाठी बसलेली असतांना साधिकेला आलेली अनुभूती

मारुतिराया मला सूक्ष्मातून म्हणाले, ‘तू अजूनही स्थुलातच अडकली आहेस का ? अगं, मी सूक्ष्मातून तुझ्याकडेच पहात आहे.’ तेव्हा मला त्याची जाणीव होऊन मी त्याची क्षमायाचना केली.

सनातन संस्था आयोजित ८ दिवसांचे ‘ऑनलाईन’ रामनाम संकीर्तन अभियान पार पडले !

हिंदूंना रामनामाची शक्ती आणि आशीर्वाद मिळावा, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ८ दिवसांचे ‘ऑनलाईन’ रामनाम संकीर्तन अभियान आयोजित करण्यात आले होते. या संकीर्तनाचा उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि बंगाल या राज्यांतील अनेक रामभक्तांनी लाभ घेतला.