सुनावणीच्या वेळी भगवान केशव महाराज यांची मूर्ती न्यायालयात उपस्थित !

श्रीकृष्णजन्मभूमीच्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी भगवान केशव महाराज यांची मूर्ती न्यायालयात आणण्यात आली. या प्रकरणात २३ जानेवारी या दिवशी सुनावणी झाली होती. त्या वेळी न्यायालयाने या प्रकरणातील ६ क्रमांकाचे वादी भगवान केशव महाराज हे अनुपस्थित नसल्याचे म्हटले होते.

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीची अवैध वीजजोडणी तोडली !

मुळात तक्रार का करावी लागते ? प्रशासनाला हे दिसत नव्हते का ?

श्रीकृष्‍णजन्‍मभूमीच्‍या सर्वेक्षणाच्‍या निर्णयावर २५ जानेवारीला पुढील सुनावणी

श्रीकृष्‍णजन्‍मभूमीच्‍या प्रकरणाची येथील जिल्‍हा न्‍यायालयात सुनावणी झाली. या वेळी मुसलमान पक्षाकडून सर्वेक्षण करण्‍याच्‍या आदेशाच्‍या विरोधात युक्‍तीवाद करण्‍यात आला. हिंदु पक्षाकडूनही बाजू मांडण्‍यात आली.

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचेही सर्वेक्षण होणार !

काशीमधील ज्ञानवापीच्या संदर्भातही अशाच प्रकारच्या सर्वेक्षणाचा आदेश दिल्यानंतर तेथे शिवलिंग असल्याचे आणि हिंदूंची अनेक धार्मिक चिन्हे असल्याचे उघडकीस आले होते !

श्रीकृष्णजन्मभूमीतील वादग्रस्त मशिदीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या हिंदु महासभेच्या नेत्याला अटक

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याचा जलद गतीने निकाल लागण्यासाठी सरकारने प्रयत्न करून सत्य परिस्थिती समोर आणल्यास असले प्रकार वारंवार घडणार नाहीत !

श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी प्रत्येक हिंदूने इतिहास जाणून घेत धर्मासाठी वैध मार्गाने लढावे ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

खटल्याच्या माध्यमातील हे युद्ध धर्मसंस्थापनेची देवता भगवान श्रीकृष्ण याच्या जन्मभूमीसाठी करायचे आहे. १०० कोटी हिंदूंनी संघटितपणे या याचिकेला समर्थन द्यावे.

हिंदूंची मंदिरे पाडून मशिदी उभारण्याच्या चुका सुधारण्याचा विचार व्हायला हवा !

बाबरीप्रमाणे (बाबरी ढाच्याप्रमाणे) देशात अनेक प्रकरणे आहेत. त्यांवर वेळीच उपाय काढला नाही, तर ही मोठी समस्या बनेल. देशात अनेक मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारण्यात आल्या आहेत.

मुसलमान पक्ष श्रीकृष्णजन्मभूमीच्या खटल्याच्या वेळी अनुपस्थित राहून सुनावणी टाळत आहे ! – हिंदू पक्षाचा आरोप

हिंदु पक्षकार अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह आणि राजेंद्र माहेश्वरी यांनी न्यायालयात शाही ईदगाह मशीद पक्षकारावर आरोप केला आहे की, तो न्यायालयात अनुपस्थित राहून सुनावणी टाळू पहात आहेत.

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवर पूर्वेकडे असणारी मीना मशीद हटवावी !  

मथुरा येथील मीना मशिदी तिच्या मूळ जागेवरून हटवण्यात यावी, यासाठी येथील दिवाणी न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांचा दावा आहे की, ही मशीद केशव देव मंदिराच्या जागेवर बांधण्यात आली आहे.

मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी संकुलातील मीना मशीद हटवण्यासाठी न्यायालयात याचिका

आता केंद्र सरकारनेच हिंदूंच्या धर्मस्थळावर बांधण्यात आलेल्या मशिदींचे सर्वेक्षण करून सत्य समोर आणावे आणि हिंदूंना त्यांचा हक्क मिळवून द्यावा, अशीच सामान्य हिंदूंची अपेक्षा आहे !