मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीची अवैध वीजजोडणी तोडली !

तक्रारीनंतर कारवाई !

मथुरा (उत्तरप्रदेश) – मथुरा प्रशासनाने श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीची वीजजोडणी तोडली आहे. तसेच मशीद प्रशासनाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. शाही ईदगाह मशीद कमेटीचे सचिव तनसीर अहमद यांना ३ लाख रुपयांचा दंडही ठोठवण्यात आला आहे. मशिदीकडून अवैधरित्या वीजजोडणी करण्यात आली होती.

श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टकडून तक्रार करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाकडून सांगण्यात आले की, राज्यात अवैध वीजजोडणीच्या विरोधात चालू असलेल्या मोहिमेच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

मुळात तक्रार का करावी लागते ? प्रशासनाला हे दिसत नव्हते का ?