सुप्रसिद्ध पुरातत्त्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांचे विधान
|
नवी देहली – बाबरीप्रमाणे (बाबरी ढाच्याप्रमाणे) देशात अनेक प्रकरणे आहेत. त्यांवर वेळीच उपाय काढला नाही, तर ही मोठी समस्या बनेल. देशात अनेक मंदिरे पाडून तेथे मशिदी उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे आधी ज्या चुका करण्यात आल्या, त्या सुधारण्याच्या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे, असे विधान अयोध्येतील बाबरी ढाच्याचे उत्खनन करून तेथे राममंदिराचे अवशेष असल्याचे प्रथम सांगणारे प्रसिद्ध पुरातत्त्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांनी केले. भारत हा केवळ हिंदूंमुळेच धर्मनिरपेक्ष आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘देश में मंदिर तोड़कर मस्जिद बनाने के कई मामले’: आर्कियोलॉजिस्ट केके मुहम्मद बोले-ऐसी गलतियों को सुधारने के बारे में सोचना चाहिए#MadhyaPradesh #Bhopal BY: @reporterShubhihttps://t.co/Giw1IeTTz8 pic.twitter.com/TLOqWeUHcb
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) November 6, 2022
के.के. महंमद पुढे म्हणाले की,
१. मथुरा येथील श्रीकृष्णजन्मभूमी आणि काशी येथील ज्ञानवापी प्रकरणी लवकरात लवकर उपाय काढला गेला पाहिजे. येथे पुराव्यांची काही न्यूनता नाही. केवळ विचारांमध्ये पालट करण्याची आवश्यकता आहे.
२. मी मुसलमानांना नेहमीच म्हणतो की, पाकिस्तान वेगळा झाल्यावरही भारत धर्मनिरपेक्ष राहिला. हे हिंदू बहुसंख्यांक असल्यामुळेच शक्य झाले. (आता मात्र हिंदु राष्ट्र स्थापणेच सर्वथा हितावह, हेही तितकेच खरे ! – संपादक)
३. वैज्ञानिक संशोधनाचा विषय आला, तर त्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.
४. देशात पुरातत्त्व शास्त्रज्ञांना कोणतेच भविष्य नाही. सरकारही यास प्रोत्साहन देण्यासाठी विशेष काही करत नाही. भाजप सरकारकडून मला अपेक्षा होत्या; परंतु त्याने असे काहीच केले नाही. भारतीय पुरातत्त्व विभागाचा सर्वांत वाईट काळ हा भाजप सरकारच्या कार्यकाळात आहे, असे मला वाटते.
कोण आहेत के.के. महंमद ?
१. प्रसिद्ध पुरातत्त्व शास्त्रज्ञ के.के. महंमद यांनी अयोध्येतील राममंदिराच्या प्रकरणी बाबरी ढाच्याच्या ठिकाणी हिंदु मंदिर असल्याला पाठिंबा दर्शवला होता. वर्ष १९७६-७७ मध्ये जाऊन त्यांनी तेथे उत्खनन केले होते. ‘मंदिरांच्या खांबांवरच बाबरी ढाचा उभारला आहे’, असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांना मुसलमानांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. असे असले, तरी ते म्हणतात की, लोकांचा विरोध झाला, याचा अथ मी माझ्या कामाशी प्रतारणा करू शकत नाही. उत्खननात मंदिराचे अवशेष मिळाले होते. हे तथ्य आहे. इतिहासातील तथ्ये समोर ठेवणे, हाच माझा धर्म आहे. (राममंदिरासारख्या हिंदूंच्या अस्मिता जोपासण्याच्या प्रकरणी हिंदु पुरातत्त्व शास्त्रज्ञ यांनी असा विचार कधीतरी केला का ? हे हिंदूंसाठी लांच्छनास्पद ! – संपादक)
२. के.के. महंमद यांनी म्हटले होते की, देहलीत २७ मंदिरेपाडून कुतुब मिनार परिसरात कुव्वत उल् इस्लाम मशीद उभारण्यात आली होती. मंदिर पाडून त्याच्याच दगडांनी मशीद बांधण्यात आली होती. त्या ठिकाणी असलेल्या अरबी भाषेतील अभिलेख आणि ‘ताजूर मासिर’ नावाच्या पुस्तकात याचा उल्लेख आहे.