मुसलमान पक्ष श्रीकृष्णजन्मभूमीच्या खटल्याच्या वेळी अनुपस्थित राहून सुनावणी टाळत आहे ! – हिंदू पक्षाचा आरोप

मथुरा (उत्तरप्रदेश) – मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमी खटल्याच्या प्रकरणी हिंदु पक्षकार अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह आणि राजेंद्र माहेश्वरी यांनी न्यायालयात शाही ईदगाह मशीद पक्षकारावर आरोप केला आहे की, तो न्यायालयात अनुपस्थित राहून सुनावणी टाळू पहात आहेत. ‘या प्रकरणी सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाच्या अधिवक्त्यांना नोटीस देण्यात यावी’, अशी मागणी केली. न्यायालयाने यावर आदेश सुरक्षित ठेवून पुढील सुनावणी २८ ऑक्टोबरला ठेवली. या खटल्यामध्ये हिंदु पक्षकारांनी श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेली ईदगाह मशीद हटवण्याचा आदेश देण्याची मागणी केली आहे.