‘एक अप्सरा होती. तिला उत्तम पती हवा होता. एकदा तिला ध्यानात मग्न असलेला श्री गणपति दिसला. तिने त्याला हाका मारल्या. गणपति तिला म्हणाला, ‘हे माते, माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस ?’ ती म्हणाली, ‘मला तू फार आवडला आहेस. मी तुझ्याशी विवाह करणार.’ श्री गणपति म्हणाला, ‘मी विवाह करून मोहपाशात पडणार नाही.’ त्यावर अप्सरा म्हणाली, ‘तू विवाह करशीलच, असा मी तुला शाप देते.’ श्री गणपतीने तिला प्रतिशाप दिला, ‘तू पृथ्वीवर वृक्ष होशील.’ अप्सरेला पश्चात्ताप होऊन ती म्हणाली, ‘मला क्षमा कर.’ गणपति म्हणाला, ‘माते, कृष्ण तुझ्याशी विवाह करील आणि तू सुखी होशील.’ ती अप्सरा पुढे तुळस बनली. श्री गणपतीने तुळशीला कधीच आसरा दिला नाही; म्हणून श्री गणपतीला तुळस वाहात नाहीत.’ (संदर्भ : अज्ञात)
श्री गणपतीला तुळस न वाहाण्याचे कारण
नूतन लेख
नेरूळ (नवी मुंबई) येथे बौद्ध कुटुंबाने श्री गणेशमूर्तीची स्थापना केल्याने विरोध !
मिरज येथे काही गणेशोत्सव मंडळांकडून पौराणिक देखाव्यांचे सादरीकरण !
पुणे येथील मानाचे गणपति सायंकाळी ६ नंतर विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतील !
Ganesh : श्री गणेशाची विविध रूपे आणि त्यांची स्थाने
श्री गणेशाविषयीच्या काही कथा
प्रदूषणाच्या नावाखाली गणेशोत्सवच नव्हे, तर अनेक सण-उत्सवांवर बंधने आणण्याचे षड्यंत्र ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्कृती अभ्यासक