दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा विजय

शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर पहिलाच खासदार आला निवडून !

कोल्हापूर येथे शिवसेना युवासेनेच्या वतीने सायकल फेरीद्वारे इंधन दरवाढीचा निषेध !

शिवसेना युवासेनेच्या वतीने शहरात सायकल फेरीद्वारे इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शहर कार्यालय येथून फेरीचा प्रारंभ करण्यात आला.

सरकारने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी कायम ठेवावी !

यंदाही चिनी फटाक्यांवरील बंदी कायम रहावी, यासाठी भारत सरकारने जागृती करावी. अवैध मार्गांनी चिनी फटाके भारतात आणले जाऊन त्यांची विक्री होऊ नये, याची दक्षता घ्यावी. अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

जळगाव येथे युवा सेनेच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ ‘सायकल फेरी’ !

मोदी सरकारने इंधन दरवाढ तात्काळ नियंत्रणात आणून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा. आज महागाई अनियंत्रित असून सर्वसामान्य जनतेला उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे, असे सांगत ‘हे मोदी सरकार भांडवलदारांच्या हितासाठी सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहे’, असा आरोप युवा शिवसैनिकांनी केला. 

‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद करून हे प्रमाणपत्र देणार्‍या सर्व संस्थांची चौकशी करा !

हे प्रमाणपत्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून नव्हे, तर ‘जमियत-उलेमा-ए-हिंद’ या धर्मांध संघटनेकडून दिले जाते. या ‘हलाल’ अर्थव्यवस्थेने विश्वभरात दबदबा निर्माण केला असून तिने भारताच्या अर्थव्यवस्थेइतका म्हणजे २ ट्रिलीयन ‘डॉलर्स’चा टप्पा गाठला आहे.

वेळागर, शिरोडा येथील प्रस्तावित ‘ताज पर्यटन प्रकल्पा’च्या कामाला प्रारंभ होणार

महाराष्ट्र राज्य सरकारने करार केलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा, वेळागर येथील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ‘ताज पर्यटन प्रकल्पा’च्या कामाला आता प्रारंभ होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्र किनार्‍यांवर जीवन रक्षकांची नेमणूक करा ! – युवासेनेची मागणी

वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा, वेळागर समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथील परिसरासह जिल्ह्यातील गर्दी होणार्‍या समुद्र किनार्‍यांवर सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात यावी.

चिनी बनावटीचे फटाके घाऊक विक्रेत्यांनी विकू नयेत ! – करवीर शिवसेनेचे फटाके विक्रेत्यांना निवेदन

भारतात फोफावलेल्या चिनी वस्तूंच्या व्यापारात गेल्या काही वर्षांपासून चिनी फटाकेही मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यामध्ये विषारी पदार्थांचे प्रमाण पुष्कळ असते.

८ घंटे वीज चालू ठेवा; अन्यथा रस्त्यावर उतरू ! – नारायण पाटील, माजी आमदार, शिवसेना

करमाळा तालुक्यात सध्या वीजदेयक वसुलीच्या नावाखाली शेतीपंपांचा वीजपुरवठा केवळ २ घंटे करण्यात आला आहे. वीजकपात करणे हे शेतकर्‍यांवर अन्यायकारक असून तालुक्यातील शेतकर्‍यांना शेतीपंपासाठी ८ घंटे सुरळीत वीज द्यावी; अन्यथा रस्ता बंद आंदोलन करण्यात येईल….

केंद्रीय यंत्रणांचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होत आहे ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री महाराष्ट्र

राज्यात महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांच्या मागे केंद्रीय अन्वेषण यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या काही नेत्यांची केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडून चौकशी चालू आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले की, केंद्र सरकारच्या अन्वेषण यंत्रणांचा उपयोग विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी होत आहे.