८ घंटे वीज चालू ठेवा; अन्यथा रस्त्यावर उतरू ! – नारायण पाटील, माजी आमदार, शिवसेना

शिवसेनेचे माजी आमदार श्री. नारायण पाटील

सोलापूर – करमाळा तालुक्यात सध्या वीजदेयक वसुलीच्या नावाखाली शेतीपंपांचा वीजपुरवठा केवळ २ घंटे करण्यात आला आहे. वीजकपात करणे हे शेतकर्‍यांवर अन्यायकारक असून तालुक्यातील शेतकर्‍यांना शेतीपंपासाठी ८ घंटे सुरळीत वीज द्यावी; अन्यथा रस्ता बंद आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे.

याविषयी माजी आमदार पाटील यांनी सांगितले की, सध्या शेतकर्‍याला वेठीस धरले जात आहे. ही कृत्रिम वीजटंचाई असून २ घंट्यांचा वीजपुरवठा शेतकर्‍याच्या दृष्टीने अन्यायकारक आहे. महावितरणकडून २ घंटे वीजपुरवठा करण्याचा निर्णय रहित करून पूर्वीप्रमाणे शेतीपंपासाठी ८ घंटे वीजपुरवठा देण्यासाठी कार्यवाही व्हावी.