दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा विजय

शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर पहिलाच खासदार आला निवडून !

शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर

सिल्व्हासा/मुंबई – केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांचा विजय झाला आहे. कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या महेशभाई गावित यांचा ५० सहस्र ६७७ मतांनी पराभव केला आहे. शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेरून पहिलाच खासदार निवडून आला आहे. दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याने येथील लोकसभेची जागा रिक्त झाली होती. डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यानंतर त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोपही झाले होते. पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली होती.