शिर्डी येथे जाण्याचा प्रयत्न करणार्‍या तृप्ती देसाई आणि त्यांचे समर्थक पोलिसांच्या कह्यात

केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी भारतीय संस्कृती, तसेच प्रथा-परंपरा यांना वारंवार विरोध करणार्‍या तथाकथित सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे !

(म्हणे) ‘कोणत्याही परिस्थितीत शिर्डीला जाणारच !’

चित्रपट, वेब सीरिज आदींतून पसरवल्या जाणार्‍या अश्‍लीलतेला विरोध न करता सभ्यतेला विरोध करणार्‍या तृप्ती देसाई यांची विकृती !

ब्राह्मण महासंघ महिला आघाडीच्या ५० महिला शिर्डी संस्थानने लावलेल्या फलकाचे रक्षण करणार !

शिर्डी संस्थान यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्व साई भक्तांनी स्वागत केले आहे, असे असतांनाही काही विकृती त्यांचा विरोध करत आहेत. शिर्डी येथे जाऊन फलक काढण्याची भाषा करत आहेत. शिर्डी संस्थानच्या समर्थनार्थ तसेच तेथे लावलेल्या फलकाचे रक्षण करण्यासाठी ब्राह्मण महासंघ महिला आघाडीच्या ५० महिला त्या ठिकाणी सकाळी १० वाजल्यापासून थांबतील….

ब्राह्मण महासंघाचा तृप्ती देसाई यांना विरोध

तृप्ती देसाई यांना विरोध करत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष श्री. आनंद दवे यांनी सहकार्‍यांसह शिर्डी येथे लावलेल्या फलकाचे पूजन केले आणि संस्थानच्या भूमिकेला पाठिंबा दिला. १० डिसेंबरला तृप्ती देसाई  आल्यास त्याला विरोध करू, अशी चेतावणी महासंघाने दिली आहे.

तृप्ती देसाई यांना ‘जशास तसे’ उत्तर देऊ ! – शिर्डी ग्रामस्थ

भारतीय परंपरा आचरणात आणण्यासाठी संघटितपणे कृतीशील भूमिका घेणारे शिर्डी येथील ग्रामस्थ आणि सामाजिक संघटना यांचे अभिनंदन !

(म्हणे) ‘पुजारी अर्धनग्न, मग भाविकांच्या कपड्यांवर निर्बंध का ?’

व्यक्तीने परिधान केलेल्या कपड्यांचा तिच्या मनावर परिणाम होत असतो. तोकडे कपडे परिधान केल्यामुळे मन चंचल होते. त्यामुळे मंदिर, तसेच धार्मिक कार्यक्रम यांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार कपडे परिधान करण्याची पद्धत आहे. अध्यात्माचा गंध नसल्यामुळे धार्मिक विषयावर बोलू नये, याचे सामान्य ज्ञान नसलेल्या तृप्ती देसाई !

भाविकांनी साईबाबांचे दर्शन भारतीय वेशभूषेतच घ्यावे ! – साई संस्थान, शिर्डी

साई संस्थानचा स्तुत्य निर्णय ! अन्य मंदिरांनीही या निर्णयाचे अनुकरण करावे, ही अपेक्षा !

शिर्डी संस्थानने मुदत ठेवींतून कर्मचार्‍यांचे वेतन दिले, तर तिरुपती देवस्थानही त्याच विचारात !

दळणवळण बंदीमुळे मंदिरांत अर्पण येणे बंद झाल्याचा परिणाम ! हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावर सर्वच पैसा संबंधित सरकारे घेऊन जात असल्याने मंदिरांची अशी स्थिती निर्माण झाली आहे. यासाठी आता धर्माभिमानी हिंदूंनी संघटित होऊन मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवला पाहिजे !