गायरान भूमीवरील अतिक्रमणे काढून घ्यावीत ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गायरान भूमीवरील अतिक्रमणे ३१ डिसेंबरपूर्वी काढून टाकायची आहेत. सांगली जिल्ह्यातील अतिक्रमणे १० दिवसांच्या आत काढून घ्यावीत; अन्यथा ती काढून टाकण्यात येतील. व्यय संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.

अफझलखानाचा अवैध दर्गा सरकारने पाडल्‍याविषयी सांगलीत शिवप्रेमींकडून साखर वाटप ! 

अफझलखानाचा अवैध दर्गा सरकारने पाडल्‍याविषयी सांगलीत शिवभक्‍तांकडून साखर वाटप करून जल्लोष साजरा करण्‍यात आला. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या मूर्तीसमोर फटाक्‍यांची आतषबाजी करण्‍यात आली.

‘इन्फोसिस’च्या अध्यक्षा सुधा मूर्ती आणि पू. भिडेगुरुजी यांची भेट !

‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या अध्यक्षा, तसेच प्रख्यात लेखिका सुधा मूर्ती यांची श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी सदिच्छा भेट घेतली. त्या सांगली येथे एका कार्यक्रमासाठी आल्या असता भावे नाट्यमंदिर येथे ही भेट झाली.

सरकारने शिवप्रतापाची जागा शिवप्रतापदिनापूर्वी खुली न केल्यास शिवभक्त ती खुली करतील ! – नितीन शिंदे

अफझलखानाच्या थडग्याच्या उदात्तीकरणाच्या विरोधात शिवभक्तांची ‘मागणी परिषद’

सांगलीतील शिवकवच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाने साकारली विजयदुर्गची प्रतिकृती !

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर वखारभाग येथील शिवकवच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाने विजयदुर्गची प्रतिकृती साकारली असून दुर्ग पहाण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी सुमारे ३०० चौरसफुटांत हुबेहूब दुर्ग साकारून समुद्रातील मराठ्यांची वीरगाथा हिंदूंच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

अफझलखानाच्या थडग्याच्या उदात्तीकरणाच्या विरोधात शिवभक्तांची आज सांगली येथे ‘मागणी परिषद’!

‘श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलना’च्या वतीने रविवार, ३० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता दैवेज्ञ भवन येथे शिवभक्तांच्या मागणी परिदषेचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक मनोज खाडये यांचा ‘हलाल जिहाद’च्या संदर्भात सांगली जिल्हा जागृती दौरा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हलाल जिहाद’च्या संदर्भात देशव्यापी जागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यात तालुका स्तरावर ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ची स्थापना करण्यात आली. त्याचा वृत्तांत . . .

‘संजीवनी हॉस्पिटल’चे संचालक डॉ. प्रवीण कोळी यांना ‘धन्वन्तरी’ पुरस्कार प्रदान !

या प्रसंगी पू. भिडेगुरुजी यांनी ‘दैनिक ‘सनातन प्रभात हे एकमेव दैनिक हिंदूंची बाजू परखडपणे मांडते’, असे गौरवोद्गार काढले.

फटाक्यांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखा ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे निवेदन

काही फटाक्यांच्या वेष्टनांवर हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे मुद्रित केली जातात. यामुळे असे फटाके फोडल्यावर त्यांचा अवमान होतो. अशा फटाक्यांची विक्री जत येथील बाजारपेठांमध्ये केली जात आहे.

कवलापूर (जिल्हा सांगली) येथील विमानतळाची जागा अल्प मूल्यात देण्याचा प्रयत्न !

पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘या जागेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये मिळवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. वास्तविक या भूखंडाचा लाभ येतील भूमीपुत्रांनाच मिळाला पाहिजे. असे न झाल्यास आम्ही पंचक्रोशीतील नागरिकांना एकत्र करून जनआंदोलन उभारू.”