सांगली – पाकीजा मशीद परिसरातील हिंदूंच्या घरावरील आक्रमणे दिवसेंदिवस वाढत आहेत. या परिसरात रहाणार्या हिंदूंना भूमी विकण्याची धमकी दिली जात आहे. कुदळे वसाहत येथील जगदीश कुदळे यांच्या कुटुंबियांवर १०० ते २०० जणांच्या मुसलमान समाजकंटकांनी प्राणघातक आक्रमण केले. तरी कुदळे कुटुंबियांवर प्राणघातक आक्रमण कणार्या मुसलमान समाजकंटकांना अटक करा, अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष श्री. नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. टिळक स्मारक येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. नितीन शिंदे म्हणाले, ‘‘कुदळे कुटुंबावर झालेल्या आक्रमणाची पोलिसांनी गंभीर नोंद घेऊन यामागील सूत्रधार शोधून काढून त्यांना अटक करून त्यांची धिंड काढावी.’’
या संदर्भात श्री. जगदीश कुदळे म्हणाले, ‘‘समाजकंटकांनी माझ्याकडे दुकान भाड्याने मागितले होते; परंतु ते मी दिले नाही; म्हणून ते दुकान रात्रीच्या वेळी जाळण्यात आले. यात माझी लाखो रुपयांची हानी झाली. त्याही पुढे जाऊन आम्हाला जातीवाचक शिवीगाळ करून ‘घर विकून जा; अन्यथा घर पेटवून देऊ’, अशी धमकी रफीक शेख आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. तरी आम्हाला तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे आणि परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभी करावी; अन्यथा या परिसरातील हिंदूंचे जगणे अवघड होणार आहे.’’
या प्रसंगी सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. संजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री. विष्णुपंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री. विजय टोणे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गोरक्षक सेनेचे श्री. विनायक ऐडके, सर्वश्री संभाजी पाटील, हरी पाटणकर, कृष्णा नायडू, प्रकाश कोरे, वैभव लगड, प्रथमेश कोरे इत्यादी उपस्थित होते.