नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करा ! – नितीन शिंदे, माजी आमदार

सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ २४ एप्रिल या दिवशी गणपति मंदिराजवळ आयोजित केलेल्या ‘नमो संवाद’ कोपरा सभेत ते बोलत होते.

हनुमान जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात १७७ ठिकाणी गदापूजन !

हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘गदापूजना’च्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी आध्यात्मिक बळ मिळावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती अन् समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या सहभागाने सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले.

लवकरात लवकर संयुक्त मार्ग काढावा ! – विश्वजित कदम, आमदार, काँग्रेस

‘सांगलीविषयी लवकरात लवकर संयुक्त मार्ग काढावा’, असे विधान काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी १६ एप्रिल या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करून अपक्ष आवेदन भरले !

काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या सांगली येथे काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करून सांगली मतदारसंघातून अपक्ष आवेदन भरले आहे. महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाकडून सांगली येथे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली होती.

मिरज येथे गुढीवापाडव्यानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात शोभायात्रा पार पडली !

‘जय श्रीरामा’च्या जयघोषात आणि ढोल- ताशांच्या गजरात शहरात ९ एप्रिल या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्साही वातावरणात शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी उत्साही वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

सांगली येथे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक !

काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी सांगली जिल्ह्याचे सर्व नेते आणि पदाधिकारी यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेऊन ‘महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटासाठी सोडणे हा निर्णय आपल्याला पचनी पडलेला नाही’, असे म्हटले आहे.

लव्ह जिहाद पसरवण्यासाठी गावांकडे धर्मांधांचा जोर ! – विक्रम पावसकर, हिंदू एकता आंदोलन, सातारा जिल्हाध्यक्ष

भगवा ध्वज आणि हिंदु राष्ट्र हेच हिंदू एकता आंदोलनाचे ध्येय असून भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू. यासाठी प्रथम ‘सर्वधर्मसमभाव’ नावाची कीड ठेचून काढली पाहिजे. लोकसंख्या नियंत्रण कायदा झालाच पाहिजे, असे श्री. विक्रम पावसकर यांनी सांगितले.

शॉर्ट सर्किटमुळे गोठा, घर जळले : ३ गोवंशियांचा मृत्यू !

मिरज तालुक्यातील भोसे येथील देवेंद्र बापू चौगुले यांच्या गोठ्याशेजारी असलेल्या खांबावर शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याने त्यांचे कौलारू घर आणि गोठा जळून खाक झाला.

सांगली येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने आज भव्य मेळावा !

श्रीराममंदिर परिसरात असलेल्या जैन कच्छी भवन येथे हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने ९ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता हिंदूंचा भव्य मेळावा आयोजन करण्यात आला आहे.

कत्तल करण्याच्या हेतूने आणलेल्या ४१ गोवंशियांना पोलिसांकडून जीवदान !

गोवंशहत्या बंदी कायदा लागू असूनही अनेक ठिकाणी गोवंशियांना कत्तलीसाठी नेत असल्याच्या घटना उघडकीस येतात. यातून अशा प्रकारे कृती करणार्‍यांना अद्याप कायद्याचा धाक नसल्याचेच समोर येते.