गायनस्पर्धेसाठी येणार्‍या स्पर्धकांना त्यांच्या कलासाधनेला योग्य दिशादर्शन करू न शकणारे परीक्षक नेमणार्‍या विविध वाहिन्यांवरील गायनस्पर्धा !

‘अलीकडे दूरदर्शनच्या विविध वाहिन्यांवर संगीत आणि नृत्य यांच्या स्पर्धात्मक कार्यक्रमांची लाट आली आहे. ते पहातांना लक्षात आलेल्या आयोजकांच्या त्रुटी येथे दिल्या आहेत.

ठाणे येथील नामवंत शास्त्रीय गायक पं. निषाद बाक्रे यांनी जाणून घेतले महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य !

ठाणे येथील पं. निषाद बाक्रे हे शास्त्रीय संगीतातील नामवंत गायकांपैकी एक आहेत. त्यांनी डॉ. राम देशपांडे, पं. उल्हास कशाळकर, पं. दिनकर कैकिणी, डॉ. अरुण द्रविड आणि पं. मधुकर जोशी या गुरूंकडून संगीताचे शिक्षण घेतले आहे.

संगीताकडे साधना म्हणून पहाणारे आणि ‘अध्यात्म हा भारतीय संगीताचा आत्मा आहे’, असे सांगणारे ठाणे येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. निषाद बाक्रे !

‘एक कलाकार, संशोधक आणि गुरु’, अशी पदे भूषवत पं. निषाद बाक्रे यांनी शास्त्रीय संगीतातील उंची राखत कलाक्षेत्रात स्वत:चे अनन्यसाधारण स्थान निर्माण केले आहे.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने अभ्यासलेला ठाणे येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांच्या गायनाचा सप्तचक्रांशी संबंधित विविध व्याधींवर झालेला परिणाम !

संगीत हे ईश्वराची आराधना म्हणून केल्यास त्याचा अधिकाधिक सकारात्मक परिणाम स्वत:च्या समवेत ऐकणार्‍यांवरही होतो !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधिका कु. मयुरी आगवणे यांना संगीत सराव करतांना आलेल्या अनुभूती

संगीताच्या सरावाला भावजागृतीचे प्रयत्न जोडल्याने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधिका कु. मयुरी आगवणे यांना आलेल्या अनुभूती

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मनोज सहस्रबुद्धे यांनी पूर्वीचे अन् आताचे कलाकार यांचा संगीतविषयक केलेला तौलनिक अभ्यास !

जाणकार गायक आणि वादक यांचे वार्तालाप टंकलेखन करण्याची सेवा करताना त्यांच्या संगीत साधनेविषयी काही तुलनात्मक सूत्रे माझ्या लक्षात आली. सर्वांना शिकण्यासाठी ती सूत्रे या लेखात दिली आहेत.

संगीताच्या माध्यमातून ‘ईश्वरप्राप्ती’ कशी होते ?

संगीतामुळे वासना हळूहळू शांत होऊ लागतात. मन एका वेगळ्याच समाधीमध्ये रंगून जाते; परंतु यासाठी आपणास संगीत ऐकण्याची सवय बालपणापासून असावी लागते.

कलाक्षेत्रातील गुरुजनांनो, ‘कलांची निर्मिती ईश्वरप्राप्तीसाठीच  झाली आहे’, हे जाणून त्या दृष्टीने स्वतः साधना करा आणि विद्यार्थ्यांनाही त्याविषयी शिक्षण देऊन त्यांचा उद्धार करा !

गायन, वादन, नृत्य, चित्रकला, मूर्तीकला इत्यादी विविध कलांची निर्मिती ईश्वरप्राप्तीसाठीच झाली आहे. पूर्वी या कलांचा उपयोग ती शिकवणारे गुरुजन आणि शिकणारे विद्यार्थी ईश्वराच्या आराधनेसाठी करत असत.

अवघे आयुष्य संतूरवादनाच्या साधनेला समर्पित करून त्यातून ईश्वराची अनुभूती घेणारे पद्मविभूषण (कै.) पं. शिवकुमार शर्मा (वय ८४ वर्षे) !

पं. शिवकुमार शर्मा यांचा बालपणापासूनचा संतूरवादन साधनेचा प्रवास, त्यांनी घेतलेले परिश्रम, तसेच त्यांनी संगीत साधनेविषयी व्यक्त केलेले मौलिक विचार’, इथे देत आहोत.

सुप्रसिद्ध संवादिनीवादक सूरलयरत्न पं. विश्वनाथ कान्हेरे आणि सुप्रसिद्ध तबलावादक पं. तुळशीदास नावेलकर यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध संवादिनीवादक (‘हार्मोनियम’वादक) सूरलयरत्न पं. विश्वनाथ कान्हेरे आणि गोव्याचे सुप्रसिद्ध तबलावादक पं. तुळशीदास नावेलकर यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास सदिच्छा भेट दिली.