असह्य शारीरिक त्रास होत असतांना गुरूंवरील श्रद्धेच्या बळावर आनंदावस्थेत रहाण्याचा आदर्श सर्वांसमोर ठेवणारे दुर्ग (छत्तीसगड) येथील सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंग इंगळेआजोबा (वय ९१ वर्षे) !
पू. इंगळेआजोबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांना भ्रमणभाष केला होता. तेव्हा ते पुष्कळ आनंदात होते. त्यांच्या मांडीला झालेल्या अस्थिभंगांमुळे त्यांना असह्य वेदना होत असतांनाही ते मला म्हणाले, ‘‘मी आनंदात आहे. हे माझे प्रारब्धभोग आहेत.