श्रीविष्णुतत्त्वाची प्रचीती देणारे कलियुगातील दिव्य अवतारी रूप : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले !

श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा जन्मोत्सव म्हणजे साधकांसाठी ‘अमृताहूनी मधुर’, असे अनुपम अन् दिव्य पर्व असते. श्री गुरूंच्या जन्मोत्सवामुळे साधकांच्या अंतरंगात भावभक्तीची शीतल धारा प्रवाहित होऊन त्यांना आत्मानंद आणि आत्मशांती यांची अनुभूती येते.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या सहवासाने जीवनाला भक्‍तीमय कलाटणी मिळाली ! – प्रदीप चिटणीस, शास्‍त्रीय गायक, ठाणे

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यासारख्‍या संतांचे दर्शन होणे, हे खरोखरंच माझे फार मोठे भाग्‍य आहे. एवढे प्रचंड कार्य असलेल्‍या संतांविषयी मी काय बोलू ?

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेज पाहून संत तुकाराम महाराज यांच्या ‘राजस सुकुमार…’ या अभंगाची प्रचीती मिळते ! – सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित डॉ. केशव गिंडे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या गौरवास्पद कार्याविषयी आणि त्यांच्या सहवासात आलेल्या आध्यात्मिक अनुभवांविषयी पू. पंडित डॉ. केशव गिंडे संतवचनांतून सांगत आहेत . . .

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या चरणी कोटी कोटी प्रणाम !

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे संस्‍थापक-संपादक श्रीमन्‍नारायणस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा वैशाख कृष्‍ण सप्‍तमी (११.५.२०२३) या दिवशी ८१ वा जन्‍मोत्‍सव आहे. त्‍या निमित्ताने होणार्‍या त्‍यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाप्रीत्‍यर्थ चरणसेवा म्‍हणून हा विशेषांक प्रसिद्ध करत आहोत.

राष्ट्राला सुखी आणि प्रगत करण्याचे व्रत घेतलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

गोव्यातील सनातन संस्थेच्या आश्रमात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आढळतो. येथे अत्यंत पद्धतशीरपणे विविध सेवांची विभागणी केलेली आढळून येते. त्यामुळे सर्वच सेवा अल्प वेळेत आणि उच्च प्रतीच्या होतात.

‘जो ब्रह्माला जाणतो, तो स्वतः ब्रह्म होतो’, हे वेदांमधील वाक्य सार्थ ठरवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ! – पू. डॉ. शिवनारायण सेन

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ची स्थापना आणि त्या माध्यमातून होत असलेले संशोधन कार्य यांमुळे आजकालच्या इंग्रजाळलेल्या तरुणांमध्ये रुजलेली नास्तिकता मुळापासून हादरली आहे.

साधनेचा प्रसार करण्‍यासाठी कठोर परिश्रम घेणारे आणि अद्वितीय संशोधनकार्य करणारे प.पू. डॉ. आठवले !

‘गोवा येथे स्‍थित सनातन संस्‍थेचे संस्‍थापक प.पू. डॉ. जयंत आठवले हे मानवी रूपातील दैवी अवतार आहेत. त्‍यांचे आपल्‍या मातृभूमीवर, म्‍हणजेच भारत देशावर निस्‍सीम प्रेम आहे. प.पू. डॉ. आठवले यांचे अध्‍यात्‍मप्रसार आणि धर्मरक्षण यांचे कार्य संपूर्ण जगभर पसरले आहे…

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या भव्य आणि व्यापक संकल्पनेवर कार्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !   

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची एक अत्यंत भव्य आणि व्यापक अशी कल्पना त्यांच्या मनामध्ये स्फुरण पावली अन् त्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी योग्य दिशेने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या हृदयांत ‘हिंदु राष्ट्र’ हे शब्द सोनेरी अक्षरांत कोरले !  – जी. राधाकृष्णन्, भाजप नेते, तमिळनाडू

हिंदुत्वाचे कार्य करतांना कितीही अडथळे आले, तरी त्यांना धैर्याने आणि सकारात्मकतेने तोंड देऊन त्यांवर मात करण्यासाठी परात्पर गुरुदेवांनीच आम्हाला सामर्थ्य दिले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या सहवासात अनुभवलेला अमृतधारांचा वर्षाव !

प.पू. गुरुदेव श्री आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) यांचा सत्संग अचानक घडल्यानंतर मला अनुभूतींची मालिकाच पुन्हा जगायला मिळाली. – श्री. गिरीश केमकर