सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या चरणी कोटी कोटी प्रणाम !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

गुरुगीतेमध्‍ये भगवान शिव पार्वतीला सांगतात, ‘‘अज्ञानाचे मूळ उखडून टाकणार्‍या आणि ज्ञान अन् वैराग्‍य प्रदान करणार्‍या गुरुदेवांच्‍या चरणामृताचे सेवन केले पाहिजे. गुरूंच्‍या नामाचे कीर्तन अनंतस्‍वरूप भगवान शिवाचेच कीर्तन होय. गुरुदेवांचे श्रीचरण भगवान विष्‍णूचे श्रीचरण आहेत ! त्‍यामुळे गुरुदेवांच्‍याच चरणी आश्रय घेतला पाहिजे.’’

साक्षात् भगवंत ज्‍यांची अशा प्रकारे महती वर्णन करतो, त्‍या श्रीगुरूंचा जन्‍मोत्‍सव ही अनमोल पर्वणी असते. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे संस्‍थापकसंपादक श्रीमन्‍नारायणस्‍वरूप सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा वैशाख कृष्‍ण सप्‍तमी (११..२०२३) या दिवशी ८१ वा जन्‍मोत्‍सव आहे. त्‍या निमित्ताने होणार्‍या त्‍यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाप्रीत्‍यर्थ चरणसेवा म्‍हणून हा विशेषांक प्रसिद्ध करत आहोत. श्रीगुरूंची महती वाचून सर्वांचे जीवन साधनाप्रकाशाने उजळावे, ही प्रार्थना !’

संपादक