तेजस्वी आणि ध्यानस्थ ज्ञानसूर्य म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले !
परात्पर गुरु डॉक्टरांना पहाताक्षणीच माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. अखंड पावित्र्य माझ्यासमोर अवतरले होते. – सौ. सोनिया परचुरे, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना, दादर, मुंबई.
परात्पर गुरु डॉक्टरांना पहाताक्षणीच माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. अखंड पावित्र्य माझ्यासमोर अवतरले होते. – सौ. सोनिया परचुरे, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना, दादर, मुंबई.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याभोवती प्रकाशमान वलय जाणवल्यावर ‘आध्यात्मिक शक्ती त्यांच्या ठायी वास करत आहे’, असे लक्षात येणे…..
भारतीय संस्कृती आणि संस्कार यांचे संरक्षक अन् संवर्धक राष्ट्रसेवी डॉ. आठवले यांच्या पावन उद़्भव दिवसाच्या निमित्ताने धर्मसंघाच्या वतीने अनंत अनंत शुभेच्छा !
प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य या दृष्टीने विचार केला, तर डॉ. जयंत आठवले यांनी त्यांच्याकडून भक्तीचा मार्ग उत्तम प्रकारे प्राप्त केला आहे. केवळ प्राप्त केला नाही, तर ‘जे जे आपणासी ठावे । ते ते इतरांसी सांगावे । शहाणे करून सोडावे । सकळ जन ।’ या समर्थांच्या उक्तीप्रमाणे त्यांनी त्यांचे अवघे आयुष्यच या कार्यासाठी वेचले आणि सनातन संस्थेचा डोलारा उभा केला.
च्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांमध्ये असे काहीतरी आहे की, एकदा त्यांच्याकडे गेलेली व्यक्ती त्यांचीच होते ! याच निरपेक्ष प्रीतीमुळे जिज्ञासू अथवा मान्यवर पहिल्या भेटीतच त्यांच्याशी कशा प्रकारे जोडले जातात, हे या निमित्ताने पाहूया !
दूरचित्रवाणीवरील ‘महाभारत’ या सुप्रसिद्ध मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे सौरभ राज जैन हे पत्नी रिद्धीमा आणि अन्य कुटुंबीय यांच्यासह सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना भेटले.
प्रसिद्ध संगणकतज्ञ पद्मश्री डॉ. विजय भटकर यांनी वर्ष २००४ मध्ये सुखसागर, फोंडा येथील आश्रमाला भेट दिली. त्यांनी सनातनचे कार्य जाणून घेतले.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात हा आध्यात्मिक शिकवणीचा प्रभाव मला दिसून आला. सहस्रो जिज्ञासू तेथे येतात आणि तेथील सात्त्विकतेमुळे त्या सहस्रो लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन पालटतो. तेथील शक्ती म्हणजे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !….
पू. डॉ. शिवकुमार ओझा यांची भेट झाल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांनी त्यांच्याकडून ‘स्वतः ‘आय.आय.टी.’मध्ये एक प्राध्यापक असूनही अध्यात्माचा इतका सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा त्यांना कशी मिळाली ?’, हे समजून घेतले !
सनातनच्या रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वास्तव्य आहे. सर्वांनी तेथे एकदा अवश्य जावे ! तेथे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ठायी ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचे साक्षात दर्शन घडते !