प.पू. आठवले गुरुजींनी घालून दिलेले सिद्धांत खर्‍या साधक कलाकारांना दिशा देत रहातील ! –  पंडित निषाद बाक्रे, शास्त्रीय गायक, ठाणे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासमवेत पंडित निषाद बाक्रे

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याभोवती प्रकाशमान वलय जाणवल्यावर ‘आध्यात्मिक शक्ती त्यांच्या ठायी वास करत आहे’, असे लक्षात येणे

पंडित निषाद बाक्रे

एकदा माझी प.पू. आठवले गुरुजी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांच्याशी भेट झाली होती. तेव्हा मला त्यांच्याभोवती एक प्रकाशमान वलय अगदी स्पष्टपणे जाणवले. ते पाहून ‘आध्यात्मिक शक्ती ही नुसती कल्पना नसून ते वास्तव आहे आणि ती शक्ती प.पू. गुरुजींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) ठायी सहजतेने वास करत आहे’, हे त्यांच्या अल्प सहवासातच माझ्या लक्षात आले.

२. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अध्यात्माविषयी काही सांगतील’, असे वाटणे; मात्र त्यांनी अतिशय सहज आणि मित्रत्वाच्या भावाने संवाद साधणे

प.पू. आठवले गुरुजींमधील आध्यात्मिक शक्तीची जाणीव झाल्यावर मला वाटले, ‘ते मला (साधनेविषयी) काही गोष्टी सांगतील’; पण माझ्याशी संवाद साधतांना ‘जणू ‘मी त्यांच्यापैकीच एक आहे’, अशा मित्रत्वाच्या भावाने ते माझ्याशी बोलत होते. त्यांनीच मला संगीताविषयी विविध प्रश्न विचारून जाणून घेतले आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय पाहून काय अनुभवले ?’, असेही विचारले. हा मला संपूर्ण वेगळा अनुभव आला आणि त्यातून चांगला बोधही मिळाला.

३. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेल्या संगीतातील संशोधनामुळे कलाकार साधकांना दिशा मिळून त्यांच्या जीवनाचे सार्थक होईल’, असे वाटणे

‘अध्यात्म, कला आणि त्यातही गायनकला यांचा थेट संबंध आहे’, यात काही शंका नाही. प.पू. गुरुजींनी याविषयी अतिशय सखोल संशोधन केले आहे. त्या संशोधनाचा गायनकलेला उत्तरोत्तर अधिक उपयोग होईल. त्यामुळे कलेचे आणि पर्यायाने कलाकार साधकांच्या जीवनाचे खर्‍या अर्थाने सार्थक होईल. आजची कला ही कलाकाराला अंतर्मुख करण्याऐवजी बर्हिमुख करत आहे. अशा वेळी प.पू. गुरुजींनी घालून दिलेले सिद्धांत खर्‍या साधक कलाकारांना दिशा देत रहातील.

४. प.पू. आठवले गुरुजींचे कार्य पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.

प.पू. गुरुजींना ८१ व्या वाढदिवसानिमित्त पुष्कळ शुभेच्छा आणि यानिमित्त त्यांच्या चरणी शतशः नमन !’

– पंडित निषाद बाक्रे, शास्त्रीय गायक, ठाणे. (२३.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक