रत्नागिरीला येत असतांना दहिसरचे मनसे शाखा उपाध्यक्ष देवेंद्र साळवी यांचा अपघातात मृत्यू

मनसेचे राज ठाकरे यांची ६ मे या दिवशी रत्नागिरीला होत असणार्‍या सभेसाठी मुंबईहून येत असतांना दहिसर येथील मनसेचे शाखा उपाध्यक्ष देवेंद्र साळवी यांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

ढवळी येथील भंगारअड्ड्याला भीषण आग : लाखो रुपयांचे भंगार भस्मसात

डिचोलीतील उपजिल्हाधिकारी ४२ घंट्यांमध्ये ३ भंगारअड्डे हटवू शकतो, तर फोंडा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी असे का करू शकत नाहीत ?

लोटे (खेड) येथील अरोमा इंटरमिडिएट्समध्ये भीषण आग

रिॲक्टरमधील रसायनाने अचानक पेट घेतल्याने आस्थापनाच्या काही भागास भीषण आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत सुदैवाने कुणी घायाळ झालेले नसले, तरी आस्थापनाची आर्थिक हानी झाली आहे.

हानीभरपाई प्रकरणी आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करण्‍यासाठी न्‍यायाधीश स्‍वत: लोकन्‍यायालयात अपंग अर्जदाराकडे गेले !

रस्‍ते अपघातात मुलगा गमावलेल्‍या अपंग पालकांना हानीभरपाई देण्‍याचे प्रकरण शिवाजीनगर जिल्‍हा आणि सत्र न्‍यायालयात आयोजित लोकअदालतीमध्‍ये निकाली काढले.

खासगी ट्रॅव्हल्स आणि खासगी गाडी यांच्‍या अपघातात चौघे ठार !

विटा-सातारा रस्‍त्‍यावर नेवरी गावाजवळ खासगी ट्रॅव्हल्स आणि खासगी गाडी यांचा ४ मे या दिवशी सकाळी ७ वाजता समोरासमोर अपघात होऊन एकाच कुटुंबातील चारजण ठार झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या हेलिकॉप्टरचा अपघात: वैमानिक सुरक्षित !

संपत्काळातही सैन्यदलाची विमाने आणि हेलिकॉप्टर यांचे अपघात होऊ देणारा एकमेव देश भारत !

गोवा : बेतोडा येथे चारचाकी, तर कुंडई येथे कंटेनर उलटून भीषण अपघात

गोव्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र चालूच आहे. कुंडई येथे याच ठिकाणी वर्षभरात १०० अपघात घडतात; पण ते रोखण्यासाठी सरकार कोणतीही उपाययोजना करत नाही, असा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी !

मुंबईकडून पुण्‍याच्‍या दिशेने १० कि.मी.पर्यंत रांगा लागल्‍या आहेत. खोपोलीपासून ते खंडाळ्‍यापर्यंत या रांगा लागल्‍या आहेत. एका चारचाकी गाडीला आग लागल्‍याने ती जळून खाक झाली आहे.

लुधियाना (पंजाब) येथे वायू गळतीमुळे ११ जणांचा मृत्यू

वायू गळतीच्या घटनेमुळे अग्नीशमन दल आणि पोलीस यांनी घटनास्थळी जाऊन हा संपूर्ण परिसर बंद केला. या वायू गळतीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या संशोधनात चिंता वाढवणारा निष्कर्ष !

समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी या प्रवासासाठी लागणारा वेळ अल्प झाला आहे; मात्र सतत होणार्‍या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.