
रत्नागिरी – खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहत असलेल्या लोटे एम्.आय.डी.सी. येथील ‘अरोमा इंटरमिडिएट्स’ आस्थापनामध्ये ५ मेच्या सकाळी ११.३० वाजता रिॲक्टरमधील रसायनाने अचानक पेट घेतल्याने आस्थापनाच्या काही भागास भीषण आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत सुदैवाने कुणी घायाळ झालेले नसले, तरी आस्थापनाची आर्थिक हानी झाली आहे.
एम्.आय.डी.सी. आणि खेड येथील अग्नीशमन दलाने आस्थापनाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून पंचनामा करण्याचे काम चालू करण्यात आले आहे.
गेल्या ५ दिवसांपासून लोटे एम्.आय.डी.सी. येथील पाणीपुरवठा वारंवार बंद ठेवत असल्याने रासायनिक आस्थापनांमधील रिॲक्टर थंड करण्यासाठी पाण्याची कमतरता भासत आहे.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित