नागपूर येथे बसखाली चिरडून महिलेचा मृत्‍यू !

शहरातील काँग्रेसनगरकडून धंतोली पोलीस ठाण्‍याकडे जाणार्‍या मार्गाने दुचाकीवरून शीतल यादव (वय ४२ वर्षे) जात होत्‍या. त्‍या वेळी रस्‍त्‍यावर उभ्‍या असलेल्‍या मालवाहतूक पिकअप व्‍हॅनच्‍या चालकाने बाहेर न पहाता वाहनाचा दरवाजा उघडला.

रत्नागिरी : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघातानंतर मृत्यू

सकाळी ज्याच्या विरोधात बातमी येते, त्याच्याच गाडीची धडक बसून पत्रकाराचा मृत्यू होतो. हा योगायोग असू शकत नाही. हा ठरवून घडवून आणलेला घातपात आहे. याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे.

राज्‍यात सर्वाधिक अपघात नाशिक जिल्‍ह्यात !

जिल्‍ह्यात रस्‍ते अपघातांची संख्‍या वाढत असून गेल्‍या ६ मासांच्‍या कालावधीत नाशिक शहर आणि जिल्‍ह्यात ६०२ जणांचा अपघाती मृत्‍यू झाला आहे.

जुना पुणे नाका ते सोरेगाव रस्‍त्‍याचे काम अपूर्ण राहिल्‍याने अपघातांची संख्‍या वाढली !

जुना पुणे नाका ते सोरेगाव हा ५४ मीटरचा रस्‍ता तातडीने पूर्ण करा, अशी मागणी ‘वेकअप फाऊंडेशन’ने महापालिकेतील अतिरिक्‍त आयुक्‍त संदीप कारंजे यांच्‍याकडे निवेदनाद्वारे केली. हा रस्‍ता रखडल्‍याने शहरातील अपघातांची संख्‍या वाढली असून नागरिकांचे नाहक जीव जात आहेत, असे निवेदनात म्‍हटले आहे.

‘महावितरण’च्‍या पुणे परिमंडळामध्‍ये वर्षभरात ५३ नागरिकांचा विजेच्‍या धक्‍क्‍याने मृत्‍यू

तुटलेल्‍या तारा, पडलेले खांब हटवण्‍याचा प्रयत्न करणे, ‘स्‍वीच बोर्ड’ आणि वायर स्‍वत:च दुरुस्‍त करणे, ओल्‍या लाकडी काठ्या किंवा लोखंडाने तारांना स्‍पर्श करणे आदी कारणांनी अपघात झाल्‍याचे समोर येत आहे.

हिलटॉप बार अँड रेस्टॉरंटमध्ये झालेला स्फोट गॅस गळतीमुळे ! – उपअधीक्षक जीवबा दळवी

‘ही एक गंभीर घटना आहे आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अशा घटना हाताळण्यास पूर्णपणे सक्षम आहे.’’ स्फोटाविषयी संशयास्पद काही नाही ! – जसपाल सिंह, पोलीस महासंचालक

शाळेची सहल घेऊन जाणार्‍या बसचा पुणे-बेंगळूरू राष्‍ट्रीय महामार्गावर अपघात !

शाळेची सहल घेऊन जाणार्‍या एस्.टी. बस आणि कंटेनर यांचा अपघात झाला असून ३ विद्यार्थ्‍यांसह २ शिक्षक किरकोळ, तर एक शिक्षक गंभीर घायाळ झाले आहेत.

म्हापसा येथील ‘हिल टॉप रेस्टॉरंट’मध्ये भीषण स्फोट

रेस्टॉरंटमधील २ सिलिंडर सुस्थितीत असल्याने हा स्फोट घरगुती वापराच्या सिलिंडरच्या स्फोटाने झाल्याचा दावा फेटाळण्यात आला आहे. स्फोटाचे कारण अजूनही उलगडलेले नाही.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावरील अतूट श्रद्धेच्‍या बळावर अपघातासारख्‍या कठीण प्रसंगाला स्‍थिरतेने तोंड देणारी सोलापूर येथील कु. सुवर्णा श्रीराम (वय १९ वर्षे) !

‘गुरुदेवांचे हात माझ्‍या डोक्‍यावर आहेत’, असे अखंड अनुभवत होते. ‘माझ्‍या डाव्‍या हाताला आता बोटे नाहीत’, याची मला भीती वाटत नव्‍हती किंवा भविष्‍याविषयी कोणतीही काळजी मला वाटत नव्‍हती.