मराठ्यांना कुणबी जातीचा दाखला दिल्‍यास राज्‍यभर आंदोलन करणार ! – बबनराव तायवाडे, अध्‍यक्ष, राष्‍ट्रीय ओबीसी महासंघ

सामाजिक न्‍याय विभागाने १ जून २००४ या दिवशी महाराष्‍ट्रातील इतर मागासवर्गाच्‍या सूचीत सुधारणा करणारा शासन निर्णय लागू केला. ‘या शासन निर्णयात काही सुधारणा करून हा निर्णय मराठवाड्यात लागू करा’,…

सरकारचा अध्‍यादेश घेऊन अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली !

मराठा समाजाला आरक्षण मिळण्‍याच्‍या मागणीसाठी आंदोलन करणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन चालूच रहाणार आहे. त्‍यांच्‍या वतीने १ शिष्‍टमंडळ मुंबई येथे जाणार आहेत.

जोपर्यंत समाजात भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण राहिले पाहिजे ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

आरक्षण हे काही आर्थिक आणि राजकीय बरोबरीपुरते मर्यादित नाही, तर ते सामाजिक बरोबरी आणि मान मिळणे, यांसाठी आहे. त्यामुळे राज्यघटनासंमत आरक्षणाचे संघाने नेहमीच समर्थन केले आहे.

निजामकालीन नोंदींवरून मराठ्यांना कुणबी जातीचे आरक्षण लागू करण्यास सरकार सहमत !

अंतरवाली सराटी येथील ३ सहस्र ३३२ आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केलेले गंभीर गुन्हे मागे घेण्याचे आश्‍वासनही सरकारने दिले आहे.

मराठा समाजाच्‍या आरक्षणासाठी सरकारला आम्‍ही रिक्‍शा भरून कागदपत्रे देतो ! – मनोज जरांगे, आंदोलनकर्ते

सरकारने कुठेही न जाता आमच्‍याकडे यावे. आमच्‍याकडे रिक्‍शा भरून कागदपत्रे आहेत. ते पुरावे पाहिल्‍यावर एका दिवसात मराठा समाजाला आरक्षण देण्‍याविषयीचा अध्‍यादेश काढता येईल, असे प्रतिपादन आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.

मराठा आरक्षणास श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचा पाठिंबा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

७ सप्‍टेंबर या दिवशी होणार्‍या ‘सांगली बंद’ला श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचा पाठिंबा सांगली – मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे, यासाठी जे आंदोलन चालू आहे, त्‍या आंदोलनास श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचा पाठिंबा आहे. ही समस्‍या न्‍यायालयीन मार्गाने आणि सर्वांच्‍या सहकार्याने सुटून त्‍यातून मार्ग निघावा अन् मराठा समाजास आरक्षण मिळावे. अन्‍य समाजाला ज्‍याप्रकारे आरक्षण आहे, त्‍याप्रकारे मराठा समाजालाही आरक्षण मिळावे. … Read more

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकार सकारात्मक !

फडणवीस हे ब्राह्मण असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या माध्यमातून कुणीही जातीचे राजकारण करू नये, असे मत नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

मराठा आरक्षणासाठी गंगापूर तालुक्यातील प्रत्येक गावात उपोषणाला प्रारंभ !

गंगापूर येथील तहसील कार्यालयात तहसीलदार सतीश सोनी यांना मराठा समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गंगापूर तालुक्यातील प्रत्येक गावात ३ दिवस ‘साखळी उपोषण’ करण्यात येणार आहे.

माजी मंत्र्यांचा आदर्श घेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यागपत्र द्यावे ! – शरद पवार

मुंबई येथील घटनेनंतरही माजी गृहमंत्री दिवंगत रा.रा. पाटील यांनी त्यागपत्र दिले होते. पूर्वीच्या या उदाहरणांतून फडणवीस यांनी प्रेरणा घेऊन त्यावर विचार करावा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

मराठा आरक्षणाविषयी न्‍यायालयीन प्रक्रियेची माहिती देण्‍यासाठी शंभूराज देसाई यांनी घेतली उदयनराजे यांची भेट !

खासदार उदयनराजे भोसले म्‍हणाले, ‘‘आज मराठा समाजाची अवस्‍था वाईट आहे. जे लोक मराठा समाजाचे राजकारण करतात. त्‍यांनी इतके वर्ष आरक्षण का दिले नाही