राधाकृष्‍ण विखे पाटील यांना काळे फासणार्‍यास ‘मल्‍हार सेने’कडून ५१ सहस्र रुपयांच्‍या पारितोषिकाची घोषणा !

८ सप्‍टेंबर या दिवशी धनगर समाजाच्‍या शेखर बंगाळे नामक तरुणाने भाजपचे नेते तथा राज्‍याचे महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या अंगावर भंडारा उधळून धनगर समाजाला आरक्षणाची मागणी केली होती.

मनोज जरांगे पाटील यांचा उपचार आणि पाणी घेण्यास नकार !

सरकारला कालपर्यंत दिलेला वेळ आता संपला आहे. याचा अर्थ असा नाही की, सरकारने प्रयत्न केले नाहीत. त्यांनी प्रयत्न केले; पण त्यांनी काढलेल्या अध्यादेशामध्ये चुका झाल्या.

नागपूर येथे ओबीसी संघटनांच्या आंदोलनास प्रारंभ !

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, अशी चेतावणी ओबीसी महासंघाने दिली आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात समिती गठीत ! – प्रवीण दरेकर, आमदार

माथाडी भवन येथे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

मराठा समाजाला ओ.बी.सी. संवर्गात समाविष्ट करू नये !

मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावे, ही मराठा समाजाची मागणी असतांना त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओ.बी.सी. प्रवर्गात घुसवण्याचा सरकारचा विचार आहे. तसे झाले, तर पुढे होणार्‍या परिणामांना सरकार उत्तरदायी राहील – ओ.बी.सी. संघटना, सिंधदुर्ग

सरसकट कुणबी समाजाला प्रमाणपत्र द्यावे ! – उपोषणावर मनोज जरांगे-पाटील ठाम 

राज्य सरकार आणि मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यात ९ सप्टेंबर या दिवशी झालेली चर्चेची तिसरी फेरी निष्फळ ठरली. यामुळे जरांगे यांनी आपले उपोषण अव्याहत चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

आज समयमर्यादेनुसार शेवटचा दिवस; निरोप न आल्‍यास सलाईन काढणार !

मनोज जरांगे म्‍हणाले की, सरकारसाठी आम्‍ही एक पाऊल मागे आलो. रात्रीच निरोप येणार होता; मात्र अजून सरकारचा निरोप आला नाही. आज आम्‍ही सरकारच्‍या निरोपाची वाट पहात आहे. सरकारचा निरोप येईपर्यंत नाव घोषित करणार नाही.

मराठ्यांना आरक्षण द्या, अन्‍यथा समान नागरी कायदा लागू करा ! – मुधोजीराजे भोसले, भोसले घराण्‍याचे विद्यमान वंशज

राजघराणे आणि उद्योजक यांना आरक्षण नको; पण समाजातील इतरांना नोकरी आणि शिक्षण यांसाठी आरक्षण हवे आहे. आम्‍हाला राजकीय आरक्षण नकोच. एकदा समान नागरी कायदा लागू झाला, तर प्रत्‍येकाला आपापल्‍या क्षमतेप्रमाणे शिक्षण आणि नोकरी मिळू द्यावी.

‘इंडिया’ आघाडीतील पक्षांचा सनातन हिंदुविरोधी खरा चेहरा समोर आला आहे ! – नितेश राणे, प्रवक्ते, भाजप

‘इंडिया’ आघाडीतील पक्षांकडून सनातन हिंदु धर्मावर खालच्या पातळीवर येऊन टीका होत आहे. ‘इंडिया’ आघाडीत सनातन हिंदु धर्माला कुठेच स्थान नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.

ओबीसींच्‍या आरक्षणाला धक्‍का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्‍याविना स्‍वस्‍थ बसणार नाही, असे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ६ सप्‍टेंबर या दिवशी स्‍पष्‍ट केले.