धुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभेत कार्यकर्त्यांचा गोंधळ !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवनात ९ फेब्रुवारी या दिवशी आयोजित केलेल्या ‘परिवार संवाद’ कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील आले होते. त्या वेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार करतांना छायाचित्र काढण्यासाठी रेटारेटी केल्याने गोंधळ झाला.

संगम माहुली येथे उसाच्या शेताला लागलेल्या आगीत ८ एकरातील ऊस जळला

या आगीत ८ एकरातील ऊस जळून गेला. त्यामुळे ६ शेतकर्‍यांची लक्षावधी रुपयांची हानी झाली. नदीकाठी असलेल्या कचर्‍याला आग लावण्यात आली होती.

मुंबईत आधुनिक वैद्यांचे अपहरण करणार्‍या टोळीला अटक

इतक्या मोठ्या प्रमाणावर गंभीर गुन्हे नोंद असूनही गुंड आणखी गुन्हे करण्यासाठी मोकाट फिरत असणे, हे कायदा आणि सुव्यवस्था यांच्या अपयशाचे द्योतक आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

घोटी (नांदेड) येथील जिल्हा परिषदेची शाळा अज्ञातांकडून जे.सी.बी.ने भुईसपाट !

रात्रीच्या वेळी केलेले हे कृत्य नक्कीच मोठा संशय निर्माण करणारे आहे. शासनाच्या शाळेची इमारत पाडण्याचे धैर्य करणार्‍या म्हणजे शासनाच्या विरोधात जाणार्‍या या सूत्रधारांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी !

‘मद्य दुकान हटवा, मगच सरपंच आणि उपसरपंच निवडा !’  

एवढी आंदोलने करून ही मद्यविक्री बंद न करणारे प्रशासन आणि मद्यविक्रेते यांच्यात काही साटेलोटे आहे कि काय, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांत आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम !

माता-पित्यांना न सांभाळणार्‍या वाशिम जिल्हापरिषदेतील कर्मचार्‍यांना ३० टक्के रक्कम माता-पित्यांच्या खात्यांत जमा करावी लागणार !

वाशिम जिल्हा परिषदेने घेतलेला स्तुत्य निर्णय !

जामखेड (जिल्हा नगर) येथील पोलीस ठाण्यात भास्कर पेरे यांच्यावर गुन्हा नोंद

ग्रामपंचायत निवडणुकीत मुलीचा पराभव झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून आदर्श गाव पाटोद्याचे (जिल्हा संभाजीनगर) माजी सरपंच भास्करराव पेरे यांनी अर्वाच्च भाषा वापरून पत्रकारांना अवमानित केले. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात पेरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

प्रदूषणामुळे तेरवाड (जिल्हा कोल्हापूर) नंतर आता शिरोळ बंधार्‍यात सहस्रो मासे मृत्यूमुखी

निष्क्रीय आणि दायित्वशून्य प्रदूषण मंडळ !

पिंपरी-चिंचवड येथील आर्टीओ परिसरात आग लागून २ वाहने जळून खाक

आर्टीओ परिवहन कार्यालयाच्या परिसरात अनुमाने १५९ वाहने होती. परिसराच्या एका भिंतीजवळ कचर्‍याला दुपारी अचानक आग लागली.

दिग्रस (यवतमाळ) येथे दुसर्‍यांदा जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय !

वारंवार पाण्याची नासाडी होऊन नागरिकांची गैरसोय होत असल्याने याकडेे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अधिकार्‍यावर कठोर कारवाई हवी !