संभाजीनगर येथे कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या निराधार बालकांच्या शोधासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना !

जिल्ह्यातील गावांत ४६३ ‘ग्रामबाल संरक्षण समित्या’ कार्यरत आहे. समित्यांना निराधार झालेल्या बालकांचा शोध घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

पुणे येथील मंदिरातून दानपेटीसह दीड लाख रुपयांची चोरी

गुरुवार पेठ परिसरात असलेल्या श्री आदेश्‍वर महाराज मंदिर ट्रस्टच्या गोटीवालाधडा या मंदिरामधील नाकोडा भैरव जैन मंदिरातून १६ मेच्या रात्री २ चोरांनी दानपेटीसह १ लाख ५३ सहस्र रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.

खतांच्या दरवाढीच्या विरोधात सोलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन

कोरोनाचा संसर्ग वाढलेला असूनही आंदोलनांमध्ये नियमांचे उल्लंघन करणार्‍या कार्यकर्त्यांवर प्रशासन कारवाई करणार का ?

‘म्युकरमायकोसिस’चे सोलापूर जिल्ह्यात ७५ रुग्ण आढळले

कोरोनातून बरे झाल्यानंतर एका सप्ताहात काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ची लागण होत असल्याचे समोर येत आहे.

दर्गाह येथे अधिक संख्येने नमाजपठणासाठी आलेल्यांना मनाई केल्याप्रकरणी धर्मांधांकडून पुजार्‍याला मारहाण

विजय चौकात असलेल्या राजे बागसवार दर्गाह येथे नमाजपठणासाठी अधिक संख्येने आलेल्या लोकांना मनाई केल्यावरून जब्बार रहिमतुल्ला शेख आणि सुरज फकीर मुलाणी यांनी दर्गाहची देखरेख तसेच देवतांची पूजा करण्याचा परंपरागत मान असणारे सुनील लावंड यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली.

पिंपरी (पुणे) येथे ६ कोटी रुपयांचे रक्तचंदन पकडले !

रक्तचंदनाने भरलेला ट्रक ताथवडे येथे आहे, अशी माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ६ कोटी ५२ लाख ५४ सहस्र रुपयांचे रक्तचंदन जप्त केले आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम जयंती साजरी

संपूर्ण महाराष्ट्रासह हे जग कोरोनामुक्त व्हावे, यासाठी महामृत्यूंजय जपाची सामूहिक आवर्तने करण्यात आली.

सांगली जिल्ह्यातील कडक दळणवळणबंदी २६ मेअखेर वाढवली ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचे अवलोकन केल्यावर ही कडक दळणवळण बंदी २६ मेअखेर वाढवण्यात आली आहे.

लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोलापूर महापालिकेत बालरोगतज्ञांची बैठक

सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून महापौर आणि आयुक्त यांच्या निर्देशानुसार कोरोनाची तिसरी लाट आणि लहान मुलांची कोरोना संसर्गापासून दक्षता घेण्यासंदर्भात आराखडा सिद्ध करण्यात येत आहे.

निवृत्त भूमी अभिलेख अधिकार्‍याकडे ८८ लाख रुपयांची बेहिशेबी मालमत्ता

अधिवक्त्याकडून १ कोटी ७० लाख रुपयांची लाच स्वीकारण्याच्या प्रकरणात बाळासाहेब वानखेडे यांना अटक करण्यात आली होती. त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा ८८ लाख ८५ सहस्र रुपयांची मालमत्ता अधिक असल्याचे आढळून आले.