पोलीस कर्मचार्‍यांशी गैरवर्तणूक करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे सांगली पोलीस अधीक्षकांना निवेदन 

समाज विध्वंसक कृत्यात सहभागी असलेल्या, जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर कठोर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.

उजनी धरणातून सोलापूरसाठी भीमानदीत सोडण्यात आले पाणी

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या स्रोतांपैकी एक असलेल्या औज बंधारा कोरडा पडला असून टाकळी बंधार्‍यात सध्या सोलापूर शहराला पुढील १५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शेष आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती टाळण्यासाठी धरणातील पाण्याचे आधीच नियंत्रण ! – दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर 

दोन वर्षांपूर्वी आलेल्या पूर परिस्थितीचा अभ्यास करून मागील वर्षी धरणाच्या पाण्याचे आधीच नियंत्रण केले होते. यावर्षी त्याच पद्धतीने संभाव्य पूर नियंत्रणाचे नियोजन सर्व विभागांच्या समन्वयाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

कोरोनाची तिसरी लाट आल्यास उपचारांसाठी ३०० हून अधिक खाटांची व्यवस्था ! – राजेश पाटील, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

कोरोनाची तिसरी लाट आल्यास महापालिका प्रशासनाने लहान मुलांकरिता वाय.सी.एम्. रुग्णालयामध्ये १५० ऑक्सिजन बेड, ३० आयसीयू बेड आणि जिजामाता रुग्णालयात १५० खाटांची व्यवस्था केली आहे.

कोल्हापूर शहरात म्युकरमायकोसिस उपचारासाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी

जिल्ह्यात कोरानामुक्त झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) ची लक्षणे आढळत आहेत. काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात, तर काहींना घरीच उपचार चालू आहेत.

कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी ईश्‍वराने आपली निवड केली याचा मला अभिमान वाटतो ! – सुमन मोघे

शासकीय रुग्णालयातील स्वच्छता कामगार सुमन मोघे या प्रतिदिन ‘घर ते रुग्णालय आणि रुग्णालय ते घर’, असे १० कि.मी.चे अंतर पायी सर करतात. या रुग्णालयात गेल्या ५ वर्षांपासून त्या काम करत आहेत.

कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन न केल्याने नगर येथील १९ सहस्र नागरिकांवर कारवाई !

कोरोनाचा प्रादुर्भाव अल्प करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. प्रशासनाकडून लागू केलेल्या कोरोनाप्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

आयुर्वेदाची पदवी असतांना अ‍ॅलोपॅथीची पदवी असल्याचे दाखवून रुग्णांची दिशाभूल

विनीत रुग्णालयाचे संचालक डॉ. विद्याधर पंढरीनाथ सूर्यवंशी यांच्या विरोधात आयुर्वेदाची पदवी असतांना अ‍ॅलोपॅथीची पदवी असल्याचे लिहून रुग्णांची दिशाभूल केल्याच्या प्रकरणी महापालिकेच्या वतीने फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पुणे शहरात एकाच दिवशी आत्महत्येच्या ३ घटनांची नोंद

या महामारीच्या काळात मन स्थिर आणि सकारात्मक ठेवण्यासाठी साधना करण्याविना पर्याय नाही. साधनेमुळेच मन स्थिर आणि खंबीर राहू शकते !

माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह १९ जणांवर आरोपपत्र प्रविष्ट केले !

येथील कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील ५२९ कोटी ३६ लाख ५५ सहस्र २६ रुपयांच्या कर्ज घोटाळ्याच्या प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील आणि त्यांचा मुलगा अभिजित यांच्यासह १९ संचालक अन् मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उत्तरदायी धरले आहे.