शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या वतीने ‘घराघरात मनामनात शंभुराजे’ या उपक्रमाने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी !

महाराष्ट्रातील नामवंत असलेल्या शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या वतीने दळणवळण बंदीच्या सर्व नियमांचे पालन करत ‘घराघरात मनामनात शंभुराजे’ या उपक्रमाने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

कोल्हापूर शहरातील कोरोना रुग्णांची ‘होम आयसोलेशन’ सुविधा बंद करण्याची ‘टास्क फोर्स’ची सूचना !

सौम्य लक्षणांचे कोरोना रुग्ण ‘होम आयसोलेशन’ (गृह विलगीकरण) कालावधीत बाहेर फिरतात. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या रुग्णांना ‘संस्थात्मक विलगीकरणा’त ठेवावे, अशी सूचना ‘टास्क फोर्स’ने केली आहेे.

तलवारी, पिस्तुले यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त

जिल्ह्यातील खामगाव येथील पोलिसांनी पुन्हा एकदा राबवलेल्या ‘कोम्बिंग ऑपरेशन’मुळे २ अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात आलेे.

निधन वार्ता

म्हसवड (जिल्हा सातारा) – येथील सनातनच्या साधिका सौ. दुर्गा टकले यांच्या सासूबाई सौ. रुक्मिणी मधुकर टकले (वय ७५ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांची अचानक पहाणी करा ! – मयुर घोडके, शहरप्रमुख, शिवसेना

रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, त्या ठिकाणी ‘सी.सी.टी.व्ही.’ बसवावेत, अशा मागण्यांचे निवेदन शिवसेनेचे शहरप्रमुख श्री. मयुर घोडके आणि सरचिटणीस श्री. राहुल यमगर यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे.

शिवप्रेमी सिंधुदुर्गच्या वतीने आज कुडाळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

लस घेऊन स्वतःला सुरक्षित ठेवणे हे पुष्कळ महत्त्वाचे आहे; पण रक्तदान करून दुसर्‍याला सुरक्षित करणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

शिवजयंतीच्या निमित्त लोककलाकार आणि शिवभक्त यांच्या कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंच्या साहित्याचे वाटप

‘वन्दे मातरम् शिवोत्सव’ मंडळाच्या वतीने गेली ३६ वर्षे शिवोत्सव साजरा केला जातो.

रेमडेसिविरचा काळाबाजार करणारे दांपत्य पोलिसांच्या कह्यात !

रेमडेसिविरचा काळाबाजार पूर्णपणे थांबण्यासाठी काळाबाजार करणार्‍यांना कठोर शिक्षाच हवी.

सनातनच्या साधिका सौ. सुजाता भंडारी यांच्याकडून अध्यात्मशास्त्रविषयक माहितीचा ‘व्हिडिओ’ बनवून ‘व्हॉट्सअ‍ॅपद्वारे’ प्रसार !

सनातनच्या साधिका सौ. सुजाता भंडारी यांचे माहेर सांगली येथे आहे. सांगली जिल्हा महिला संघटनेच्या वतीने ज्या महिलांचे माहेर सांगली येथे आहे त्यांच्यासाठी २५ एप्रिल ते ९ मे या कालावधीत ‘व्हर्च्युअल संमेलना’चे आयोजन केले होते.

सातारा जिल्ह्यातील कनिष्ठ अभियंत्यास लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले

समाजाला धर्मशिक्षण नसल्याने ‘स्वार्थांधता हे पाप आहे’, ही जाणीव नागरिकांच्या मनात नाही. त्यामुळे भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे अपरिहार्य आहे !