अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्त स्थानिक स्तरावर मंदिर स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करा !

प्रभु श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर १५ ते २१ जानेवारी २०२४ या सप्ताहात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील स्थानिक मंदिरांची स्वच्छता करावी आणि हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घ्यावी.

१४ जानेवारी या दिवशी १ लाख पुणेकर करणार ‘रामरक्षा पठण’ !

अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदिरातील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त पुणे येथे १४ जानेवारी या दिवशी स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी ७.३० वाजता १ लाख पुणेकर ‘रामरक्षा पठण’ करणार आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक हेमंत रासने यांनी दिली.

Rambhakti Was Crime : मुलायम सिंह यादव सरकारच्या काळात रामभक्ती करणे, हा गुन्हा होता !

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचा हिंदुद्वेष जाणा ! हिंदूबहुल भारतात हिंदुत्वनिष्ठांनी अशी स्थिती होणे हिंदूंना लज्जस्पद ! हिंदूंकडे कुणाचे वक्र दृष्टीने पहाण्याचेही धाडस होऊ द्यायचे नसेल, तर हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

अयोध्येतील ‘श्रीराम मंदिर’ हे हिंदूंच्या एकजुटीचा परिणाम ! – श्रीपाद नाईक, केंद्रीय मंत्री

दीर्घ संघर्षानंतर आज आपण अयोध्येत प्रभु श्रीराम यांचे भव्य मंदिर निर्माण करत आहोत, हा हिंदूंच्या एकजुटीचा परिणाम आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी हिंदु महासंमेलनात केले.

डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘अपने अपने राम’ कार्यक्रमाचे १८ ते २० जानेवारीला पुणे येथे आयोजन ! – मुरलीधर मोहोळ, माजी महापौर

रामजन्मभूमीवर होणार्‍या प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या पार्श्वभूमीवर डॉ. कुमार विश्वास यांच्या वाणीतून ‘अपने अपने राम’ या कार्यक्रमाचे आयोजन १८ ते २० जानेवारी या कालावधीत एस्.पी. कॉलेजच्या मैदानावर सर्वांसाठी विनामूल्य करण्यात येणार आहे.

अयोध्येत शरयू नदीच्या काठावर १०० हवनकुंड बांधले !

अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्‍या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात ८ जानेवारीपासून सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाले आहेत

ShriRam Mandir Dharmadhwaj : श्रीराममंदिरावर ४४ फूट उंच धर्मध्वज फडकणार !

त्यामुळे मंदिर आणि ध्वज यांची एकूण उंची २०५ फूट असेल. हा ध्वजासाठीचा दंड कर्णावती येथून, म्हणजे १ सहस्र ३५० किलोमीटर दूरवरून आणण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठेच्या वेळी यावर ध्वज लावतील.

श्रीरामजन्मभूमी आंदोलनात गोमंतकियांचा सहभाग ही अभिमानाची गोष्ट ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

श्रीरामजन्मभूमी आंदोलनात गोमंतकियांचा सहभाग असणे, ही अभिमानाची गोष्ट आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.

ShriRam Janmabhumi : श्रीरामजन्मभूमी आंदोलनात गोमंतकियांचा सहभाग ही अभिमानाची गोष्ट ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

‘‘श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी कारसेवक म्हणून गोव्यातील अनेक जण अयोध्येला गेले होते. राष्ट्र उभारणीच्या या कार्यामध्ये गोव्यातील लोकांचा सहभाग, ही अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक भारतियासाठी श्रीराममंदिर हे ‘राष्ट्रमंदिर’ आहे.’’

‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’कडून पुणे शहरामध्ये ‘अक्षता’ देऊन निमंत्रणाला प्रारंभ ! 

अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्‍या ‘श्रीराम मंदिर’ उद्घाटनाच्या आणि ‘श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापने’चे घरोघरी जाऊन अक्षता (निमंत्रण) देण्यास १ जानेवारी २०२४ पासून प्रारंभ करण्यात आला.