१४ जानेवारी या दिवशी १ लाख पुणेकर करणार ‘रामरक्षा पठण’ !

बोलताना कार्यक्रमाचे निमंत्रक श्री. हेमंत रासने

पुणे – अयोध्या येथील प्रभु श्रीराम मंदिरातील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त पुणे येथे १४ जानेवारी या दिवशी स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी ७.३० वाजता १ लाख पुणेकर ‘रामरक्षा पठण’ करणार आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक हेमंत रासने यांनी दिली. ‘भक्तिसुधा फाऊंडेशन’ आणि ‘समर्थ व्यासपीठ’ या संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

प्रभु श्रीराम यांना नमन, देशासाठी समृद्धी आणि सैनिकांसाठी बल अशा ३ संकल्पांसाठी ३ वेळा पठण करणार आहेत. प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या आश्रमातील शिष्य ‘रामरक्षा’ पठणाचे नेतृत्व करतील. या वेळी ‘रघुपती राघव राजाराम’ या मूळ पदाचे प्रथमच सादरीकरण केले जाणार असून अभिनेते राहुल सोलापूरकर श्रीरामजन्मभूमीचा इतिहास सांगणार आहेत.