अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्त स्थानिक स्तरावर मंदिर स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करा !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना !

२२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येतील नूतन श्रीराममंदिरात श्रीराममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. प्रभु श्रीरामभक्त या क्षणाची आतुरतेने वाट पहात आहेत. प्रभु श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर १५ ते २१ जानेवारी २०२४ या सप्ताहात हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील स्थानिक मंदिरांची स्वच्छता करावी आणि हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा घ्यावी.

या उपक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे असावे.

अ.  स्थानिक देवतेला प्रार्थना करावी.

आ. मंदिर स्वच्छता

इ. हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा

ई. कृतज्ञता