अयोध्येतील प्रभु श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त कार्यक्रम !

पुणे – अयोध्येतील रामजन्मभूमीवर शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभु श्रीरामांचे मंदिर साकारत असून रामललाच्या बाल्यावस्थेतील मूर्तीची २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होत आहे. या निमित्ताने देशभरातील वातावरण राममय झाले आहे. सर्वत्र आनंद, उत्साह पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतून ‘अपने अपने राम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ ते २० जानेवारी २०२४ या कालावधीत टिळक रस्त्यावरील एस्.पी. कॉलेजच्या मैदानावर या रामकथेचा आनंद घेता येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे, अशी माहिती संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, माजी महापौर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत दिली. या वेळी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र माध्यमप्रमुख अमोल कविटकर, नीलेश कोंढाळकर आदी उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले की, कार्यक्रमाच्या ठिकाणी राममंदिराची प्रतिकृती असलेले व्यासपीठ असणार आहे. १८ जानेवारीला औपचारिक उद्घाटन होणार असून कार्यक्रमादरम्यान समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती रहाणार आहे. डॉ. कुमार विश्वास यांची रामकथा सांगण्याची अनोखी शैली असून पुणेकर नागरिक, श्रीरामभक्त यांसाठी ही एक पर्वणी आहे. कार्यक्रमात येणार्या रामभक्तांना कोणतीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जात असून ८०-९० सहस्र लोकांसाठी आसनव्यवस्था केली जाणार आहे. येणार्या नागरिकांसाठी फिरते शौचालय, प्रथमोपचार, अग्नीशमनदल, पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी अधिकाधिक श्रीरामभक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
पुणे येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पावन तपोभूमीचे अस्तित्व अवैध उत्खननामुळे धोक्यात !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !