Congress On Ram Mandir : श्रीरामजन्मभूमीच्या वादग्रस्त ठिकाणी नाही, तर तेथून ३-४ कि.मी. अंतरावर श्रीराममंदिर बांधले ! – काँग्रेसचा फुकाचा आरोप

धाडस असेल, तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मंदिरास्थळी येऊन याविषयी सांगावे ! – हनुमानगढीचे महंत राजू दास यांचे आव्हान

(महंत म्हणजे मंदिराचा किंवा मठाचा प्रमुख)

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीरामजन्मभूमीवरील वादग्रस्त जागेवर श्रीराममंदिर बांधले जात नसून तिथून पुढे ३-४ किमी अंतरावर हे मंदिर बांधले गेले आहे, असा आरोप काँग्रेस आणि अन्य काही राजकीय पक्ष यांनी केला आहे.

हनुमानगढीचे महंत राजू दास

या आरोपावर येथील हनुमानगढीचे पुजारी महंत राजू दास यांनी म्हटले, ‘सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेल्या जागेवर श्रीराममंदिर बांधलेले नाही’, असे काँग्रेसने म्हटले आहे. मग मंदिर कुठे बांधले आहे ? धाडस असेल, तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी येथे येऊन सांगावे. काँग्रेसच्या वरिष्ठांनी सांगावे की, श्रीराममंदिर कुठे बांधले आहे ?

त्यांच्या पूर्वजांनी मनापासून सनातन धर्म तोडण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ज्याठिकाणी आपले मंदिर होते, ज्या जागेसाठी आपण लढत होतो, त्याच भूमीवर आपल्याला यश मिळाले आणि त्याच भूमीवर मंदिर बांधले जात आहे.’