श्रीरामजन्मभूमीच्या प्रकरणी मिळालेल्या भूमीवर मशीद न बांधता शेती करून धान्य हिंदू आणि मुसलमान यांना वाटावे ! – इक्बाल अन्सारी, बाबरीचे पक्षकार

बाबरीचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी यांचे आवाहन !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीरामजन्मभूमी खटल्याचा निकाल देतांना सर्वोच्च न्यायालयाने मुसलमानांसाठी मशीद बांधण्यासाठी अयोध्येत ५ एकर भूमी देण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता. त्यानुसार धन्नीपूर येथे सरकारकडून ५ एकर भूमी देण्यात आली. या ठिकाणी अद्यापही मशिदाचे बांधकाम चालू झालेले नाही. याविषयी बाबरीचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी म्हणाले की, येथे मशीद बांधण्याऐवजी शेती करून तेथील धान्य मुसलमान आणि हिंदू यांना वाटण्यात यावे.

सौजन्य अमर उजाला 

इक्बाल अन्सारी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ‘मशिदीचे काम कधी चालू होणार ?’, या प्रश्‍नावर उत्तर देतांना म्हटले की, या मशिदीचे विश्‍वस्त जफर फारूकी आहेत. ते वक्फ बोर्डाचे अध्यक्षही आहेत. त्यांना मुसलमान ‘मशीद कधी बांधणार ?’, असे विचारत नाहीत. मुसलमानांची याविषयी तक्रारही नाही. त्यांना आता मशिदीची आवश्यकताही नाही.