अंबरनाथ रेल्वेस्थानकाजवळ लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने वाहतूक विस्कळीत !

अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ लोकलगाडीचा डबा रुळावरून घसरला

ठाणे, १८ जून (वार्ता.) – अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ लोकलगाडीचा डबा रुळावरून घसरला. साइडिंग मार्गिकेवरून मुख्य मार्गिकेवर रिकामी लोकलगाडी येत असतांना सकाळी ८.२५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. लोकलगाड्या, तसेच लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या जागच्या जागीच उभ्या होत्या. यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.