विलंब झाल्‍यामुळे संतप्‍त प्रवाशांनी दिवा स्‍थानकावर लोकलगाडी रोखून धरली !

ही लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला निघाली होती; मात्र विलंब झाल्‍याने दिवा रेल्‍वेस्‍थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली. अनेक प्रवासी रेल्‍वे डब्‍याला लोंबकळत असल्‍यामुळे काही महिलांनी मोटरमनच्‍या केबिनमध्‍ये शिरून लोकल थांबवायला लावली.

पुणे-मुंबई उद्यान एक्‍सप्रेसमध्‍ये महिलेचा विनयभंग करून तिला खाली ढकलणारा अटकेत !

मध्‍य रेल्‍वेवरील पुणे-मुंबई उद्यान एक्‍सप्रेसमध्‍ये महिलेचा विनयभंग करून तिच्‍याकडील रोख रक्‍कम बळजोरीने खेचून तिला एक्‍सप्रेसमधून ढकलणारा आरोपी मनोज चौधरी (वय ३२ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी दादर रेल्‍वे पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे. 

कोकण रेल्वेच्या १२ स्थानकांच्या सुशोभीकरणाच्या कामांचा आज प्रारंभ होणार

यामध्ये कोकण रेल्वेमार्गावरील रायगड जिल्ह्यातील ३, रत्नागिरी जिल्ह्यातील ५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी या ४ स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे.

गोवा : रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प रहित करण्यासाठी विरोधकांचा सरकारवर दबाव

क्षिण-पश्चिम रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरण प्रकरणाला सर्वाेच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, तरीही गोव्यात या प्रकल्पाचे काम चालू आहे. सरकारने हा प्रकल्प रहित करावा.

पनवेल-नांदेड एक्‍सप्रेसमध्‍ये प्रचंड झुरळे !

पनवेल-नांदेड एक्‍सप्रेसमध्‍ये इतक्‍या प्रचंड प्रमाणात झुरळे झाली होती की, प्रवाशांनी ‘पेस्‍ट कंट्रोल’ केल्‍याविना गाडी पुढे जाऊ देणार नाही’, अशी कठोर भूमिका घेतली.

केंद्र सरकारच्‍या ‘अमृत भारत स्‍थानक’ योजनेअंतर्गत पुणे येथील आकुर्डी रेल्‍वेस्‍थानकाचा विकास !

भारतीय स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखालील सरकारने ‘अमृत भारत स्‍थानक’ योजनेच्‍या अंतर्गत देशभरातील ५०८ रेल्‍वेस्‍थानकांचा पुनर्विकास करण्‍याचे घोषित केले आहे.

‘अमृत भारत स्‍थानक योजने’त महाराष्‍ट्रातील ४४ रेल्‍वेस्‍थानकांचा समावेश !

देशातील रेल्‍वेस्‍थानकांच्‍या आधुनिकीकरणासाठी राबवण्‍यात येणार्‍या ‘अमृत भारत योजने’चा ६ ऑगस्‍ट या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते शुभारंभ झाला. या योजनेत महाराष्‍ट्रातील ४४ रेल्‍वेस्‍थानकांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाला विश्वगुरु बनवण्याच्या प्रयत्नाला हातभार लावूया ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

कोल्हापूरच्या सर्वांगिण विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. यात कोल्हापूर-मुंबई बंद झालेली सह्याद्री रेल्वे चालू करण्यासाठी देहली येथे २ बैठका झाल्या आहेत.

सरकारी कार्यक्रमात ‘भारतमाता की जय’च्या घोषणा देण्यास बसपच्या धर्मांध खासदाराचा विरोध !

भारतमातेचा जयजयकार करण्याला विरोध करणारे बसपचे खासदार दानिश अली भारताला इस्लामी देश बनवण्याची घोषणा करणार्‍या जिहाद्यांविषयी अवाक्षरही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

कर्जत ते भिवपुरी स्‍थानकांच्‍या दरम्‍यान रेल्‍वे रुळांखाली मोठा खड्डा !

मागील काही दिवसांत परिसरात मुसळधार पाऊस झाल्‍याने रुळांवर पाणी साचले होते. पाणी ओसरल्‍यानंतर तेथे खड्डा पडला.