खच्चून भरलेल्या प्रवाशांमुळे दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये शेकडो प्रवाशांना चढताच आले नाही !

प्रवासी संघटनांनी होळीनिमित्त होणार्‍या गर्दीची पूर्वकल्पना देऊनही रेल्वे प्रशासनाने मुंबईतून चिपळूण आणि रत्नागिरी येथे जाण्यासाठी एकही विशेष गाडी सोडली नाही. परिणामी दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये दिवा आणि पनवेल स्थानकांतील शेकडो प्रवाशांना गर्दीमुळे चढता आले नाही.

खडवली येथे झोपडपट्टीतून दगड मारणार्‍यांचा शोध चालू !

या घटनेत २ प्रवासी गंभीर घायाळ झाले. एकाच्या डोक्याला दुखापत झाली. दोघांना तत्परतेने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. यापूर्वी आंबिवली, शहाड परिसरात लहान मुले रेल्वेमार्गात खेळतांना गाडीवर दगड फेकत अनेकदा उघडकीस आले आहे.

१ एप्रिलपासून ९६ रेल्वे स्थानकांवर ‘क्यू.आर्. कोड’च्या माध्यमातून रेल्वे तिकीट काढता येणार !

तिकीट काढण्यासाठी पूर्वी प्रवाशांना मोठ्या रांगेत उभे रहावे लागत असे; मात्र केंद्रशासनाने आता रेल्वे स्थानकांवरून रेल्वेचे सामान्य तिकीट ऑनलाईन पद्धतीने काढता येणार आहे. ही सुविधा देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवर उपलब्ध होणार आहे.

Rajasthan Train Accident : अजमेर (राजस्थान) येथे झालेल्या रेल्वे अपघाताला चालकांमधील वाद कारणीभूत !

प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणार्‍या अशा चालकांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !

‘वंदे भारत’मध्ये १ लिटरऐवजी अर्धा लिटरची पाण्याची बाटली मिळणार !

प्रवाशांनी अतिरिक्त पाण्याच्या बाटलीची मागणी केल्यास त्याला अधिकची ५०० मिलीची पाण्याची बाटली कोणतीही अतिरिक्त रक्कम न आकारता देण्यात यावी. दुसरी रेलनीरची बाटली विनामूल्य द्यावी, अशी सूचना रेल्वे मंडळाने ‘आय.आर्.सी.टी.सी.’ला दिली आहे.

‘हुबळी-दादर एक्सप्रेस’ला किर्लोस्करवाडी येथे थांबा संमत ! – संजयकाका पाटील, खासदार, भाजप

सातत्याने किर्लोस्करवाडी येथे नवीन रेल्वे थांबा संमत करण्यासाठी मागणी होत होती. थांबा संमत झाल्यामुळे प्रवाशांना लाभ होणार आहे, अशी माहिती संजयकाका पाटील यांनी दिली.

मुंबईतील ८ ब्रिटीशकालीन रेल्वेस्थानकांचे नामांतर !

१३ मार्च या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबईतील ८ ब्रिटीशकालीन रेल्वेस्थानकांचे नामांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या मंत्रीमंडळाच्या बैठकीत एकूण २८ निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

Amethi Railway Stations Renamed : अमेठी (उत्तरप्रदेश) येथील ८ रेल्वे स्थानकांची नावे पालटणार !

जैस रेल्वे स्थानकाचे गुरु गोरखनाथ धाम असे नामांतर

रेल्वेच्या रुळांचा काही भाग वाकडा झाला; रेल्वे कामगारांमुळे अनर्थ टळला !

मीरा रोड रेल्वेस्थानकावर रेल्वेच्या रुळांचा काही भाग वाकडा झाला होता. त्यातच त्यावरून एक एक्सप्रेस गेली; पण तिचे डबे हलत होते.

रेल्वेची गती !

रेल्वे प्रवास म्हटला की, सध्या तो सुखदायक न ठरता त्रासदायक ठरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नियोजित वेळेत न येणारी आणि वेळेत न पोचणारी रेल्वेगाडी !