परीक्षा चालू असल्याने मध्य रेल्वेवरील लोकल वेळापत्रकानुसार चालवा !

उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे मध्य रेल्वे प्रशासनाला आवाहन !

बदलापूर – सध्या परीक्षांचा काळ चालू आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील उपनगरीय लोकल नियमित वेळापत्रकानुसार चालवाव्यात, असे आवाहन उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाने मध्य रेल्वे प्रशासनाला केले आहे. ‘लोकल फेर्‍या नियमित नसल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे या काळात तरी वेळापत्रक कोलमडणार नाही’, याची रेल्वे प्रशासनाने दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (केवळ परीक्षांच्या काळातच असे नव्हे, तर प्रतिदिनच लोकलसेवा वेळापत्रकानुसार व्हायला हवी, हे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात येत नाही का ? वेळापत्रक कोलमडल्यावर प्रशासन तसे पुन्हा होऊ नये, या दृष्टीने अभ्यास करत नाही का ? – संपादक)